नागपुरात सोयाबीन वधारले

नागपुरात सोयाबीन वधारले

नागपूर - शेतकऱ्यांनी विकल्यानंतर आता बाजारात सोयाबीनमध्ये तेजी आल्याचे चित्र आहे. कळमणा बाजार समितीत ११०० ते १७०० क्‍विंटल अशी सरासरी सोयाबीनची आवक असून, दर २८०० ते ३१०० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले आहेत. हंगामात सोयाबीनचे दर अवघे २२०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल असे होते. 

कळमणा बाजार समितीत सोयाबीनची आवक आठवडाभरापासून ११०० ते १७०० क्‍विंटल अशी आहे. परंतु शेतकऱ्यांनी आपला  माल केव्हाच विकला; त्यानंतर आता दरात तेजी आली आहे. १० जानेवारी रोजी १३५९ क्‍विंटलची आवक आणि २८५० ते ३०६८ रुपये प्रतिक्‍विंटलचे दर होते. ११ जानेवारी रोजी आवक १९८१ तर दर २८०० ते ३१७५ रुपयांवर पोचले. दरातील या तेजीमुळे तारण योजना किंवा दरातील तेजीच्या कारणामुळे सोयाबीन न विकणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ८ जानेवारी रोजी हरभऱ्याची अवघी ८ क्‍विंटल आवक होती. ३२०० ते ३४०० रुपये प्रतिक्‍विंटलने हरभरा विकला गेला. ९ जानेवारी रोजीची आवक १८३ क्‍विंटलवर पोचली, तर दर ३२०० ते ३५०० रुपये क्‍विंटल झाले. ११ जानेवारी रोजी हरभरा ३६०० रुपये क्‍विंटलवर पोचला. यापुढील काळात दरात काहीअंशी तेजीची शक्‍यता व्यापारी वर्तवितात. 

मोठ्या आकाराच्या मोसंबीचे व्यवहार १६०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलने होत आहेत. हे दर गेल्या आठवड्यापासून स्थिर असून, त्यात फार चढ-उतार होण्याची शक्‍यता नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मोसंबीची आवक १००० ते १३०० क्‍विंटल अशी आहे. महाराष्ट्रासह लगतच्या मध्य प्रदेशमध्ये बटाटा लागवड मोठ्या प्रमाणावर होते. त्या भागातून बटाट्याची आवक वाढती असून, सरासरी ४ ते ५ हजार क्‍विंटल होत आहे. आवक वाढल्याच्या परिणामी बटाट्याचे दर अवघे ३०० ते ४०० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले आहेत. त्यात नजीकच्या काळात सुधारणा होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी नाकारली. 

कांदा स्थिर
पांढऱ्या कांद्याचीदेखील बाजारात आवक होत असून, ती १ हजार क्‍विंटलच्या घरात आहे. १६०० ते २६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर कांद्याला मिळतो आहे. लाल कांदा आवक २५०० ते ३००० क्‍विंटलची आहे. लाल कांदा २२०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलने विकला जात आहे. लसूण आवक २५० ते ४५० क्‍विंटलची आहे. २००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल असे दर होते. त्यात घसरण होत ते २००० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले. आले आवक ५५० ते ६०० क्‍विंटलची आहे. तीन हजार रुपये प्रतिक्‍विंटलवर असलेले आले दर या आठवड्यात २५०० रुपयांवर  पोचले. टोमॅटोच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहे. टोमॅटोचे दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलच्या दरम्यान आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com