प्रमाणीकरणाद्वारे मिळवा सेंद्रिय उत्पादनांना हमखास बाजारपेठ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

१४ एप्रिलपासून चारदिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण 

१४ एप्रिलपासून चारदिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण 

पुणे - एकीकडे सेंद्रिय उत्पादने खरेदी करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे; तर दुसरीकडे धान्य, भाजीपाला, फळे वा दूध हे सर्व सेंद्रिय पद्धतीने उत्पादित तसेच सर्टिफाईड आहेत हे पडताळून पाहण्याबाबत ग्राहकही जागृत होत आहेत. शेतमाल सर्टिफाईड, पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला असेल तर नक्कीच मार्केटमध्ये त्याला भरघोस डिमांड मिळते. बदलत्या मार्केटची ही मागणी लक्षात घेता सेंद्रिय शेती करण्याला व उत्पादनांच्या मार्केटिंगला भरपूर वाव असल्याचे दिसते. शास्त्रोक्त पद्धतीने सेंद्रिय शेती कशी करावी, या शेतीचे शास्त्रोक्त व तांत्रिक व्यवस्थापन, आंतरमशागती, जिवामृत, दशपर्णी अर्क, निमार्क इ. सेंद्रिय निविष्ठा बनविणे व त्यांचा वापर, सेंद्रिय प्रमाणीकरण पद्धती, प्रमाणीकरणासाठी (सर्टिफिकेशन) आवश्‍यक कागदपत्रे, वैयक्तिक, गट प्रमाणीकरण, जैविक निविष्ठांचे प्रमाणीकरण, सेंद्रिय उत्पादनांना स्थानिक तसेच उपलब्ध आंतरराष्ट्रीय बाजारपेठ इ. विषयी सविस्तर मार्गदर्शन करणारे चारदिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण ता.१४ ते १७ एप्रिलदरम्यान सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरच्या वतीने आयोजिले 

आहे. यशस्वी सेंद्रिय उत्पादक शेतकरी, सेंद्रीय आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण अधिकारी यात मार्गदर्शन करतील. तसेच सेंद्रिय शेतीला शिवारफेरी आहे. प्रतिव्यक्ती साडेसात हजार रुपये शुल्क आहे. सकाळनगर, बाणेर रोड, पुणे येथे प्रशिक्षण होईल. अधिक माहितीसासाठी संपर्क - ८६०५६९९००७ 
 

Web Title: agrowon organic fruits vegetables