फळविक्रीतही शेतकरी कंगाल; व्यापारी मालामाल

तानाजी पवार
शनिवार, 6 मे 2017

पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच पुणे शहर व उपनगरांतील बाजारपेठांत निवडक फळभाज्या, पालेभाज्या यांच्यासह विविध फळांच्या दरांची पाहणीही अॅग्रोवनकडून करण्यात आली.

पुणे : पुणे शहर आणि परिसरात अॅग्रोवनने शेतीमाल खरेदी- विक्री दराचे सर्व्हेक्षण केले होते. या सर्व्हेक्षणात शेतकऱ्यांना अल्प मोबदला तर मध्यस्थ साखळी मात्र तिप्पट, चौपटीने लाभ मिळवीत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, ग्राहकांनाच याचा बोजा अधिक दर देऊन सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. 

वाढत्या महागाईने शेतीच्या लागवड खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि मिळणारा नफा याचे गणित मात्र कोलमडले आहे. उत्पादन करणारा शेतकरी पडेल त्या किमतीत शेतीमालाची मध्यस्थांना विक्री करतो. हे मध्यस्थ मात्र हा शेतीमाल मोठ्या प्रमाणात दर वाढवून ग्राहकांना विविध साखळ्यांद्वारे विकतात. ग्राहकांना हा शेतीमाल घेण्यावाचून पर्याय नसतो. त्यामुळे कुरकुरत का होईना तो मध्यस्थांच्या दराप्रमाणे हा शेतीमाल खरेदी करतो. आणि शेतकऱ्यांऐवजी मध्यस्थच अशा पद्धतीने नफा मिळवितो.

पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच पुणे शहर व उपनगरांतील बाजारपेठांत निवडक फळभाज्या, पालेभाज्या यांच्यासह विविध फळांच्या दरांची पाहणीही अॅग्रोवनकडून करण्यात आली. फळांचे विविध मार्केटमधील दर व तफावती पुढीलप्रमाणे :

Web Title: agrowon reveals middlemen making whooping profits in agri business

फोटो गॅलरी