‘संपूर्ण’ गटाची उद्योगप्रधान शेती

‘संपूर्ण’ गटाची उद्योगप्रधान शेती

गुंडेगाव (ता. जि. नगर) येथील शेतकऱ्यांनी ‘संपूर्ण शेतकरी गटा’ची स्थापना केली. गटाचे अध्यक्ष संतोष संभाजी भापकर यांच्या नेतृत्वाखाली विविध कडधान्ये पिकवत गटाने पुणे, मुंबईची बाजारपेठ हस्तगत केली आहे. महिन्याला पाच लाख रुपयांची उलाढाल करीत दूरदृष्टी व संघटनकौशल्याच्या जोरावर शेतीला उद्योगाचे स्वरूप देत वाटचाल पुढे चालू ठेवली आहे. 

गुंडेगाव नगरपासून पस्तीस-चाळीस किलोमीटरवर तालुक्यातील शेवटचे गाव. तीनही बाजूंनी डोंगर, शेती पूर्ण पावसावर अवलंबून. अलीकडेच जलयुक्त शिवार योजनेत सहभाग. त्यामुळे पाण्याची काही प्रमाणात सोय.

शेती 
हुलगे, मटकी, कारळे, मूग, उडीद, तीळ, सोयाबीन, जवस, तूर, बाजरी, ज्वारी ही पिके घेताना रासायनिक पद्धतीचा वापर शक्‍यतो नसायचा. त्यामुळे शेतमाल शक्यतो सेंद्रियच असायचा. मात्र त्याला बाजारपेठ उपलब्ध नव्हती.  

रस्त्यावर विक्री 
भापकर यांनी काहींना मार्केटिंगमध्ये प्रशिक्षित केले. रस्त्याच्या बाजूला सेंद्रिय मालाचे मार्केटिंग सुरू केले.   
व्हिझिटिंग कार्डस तयार केली. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना ती देण्यात येऊ लागली. ग्राहक घरी गेल्यानंतर फोन करायचे व मालाची मागणी करायचे. ग्राहक पुण्याचा असेल तर तो आमच्या भागात कोठे मिळेल असे विचारायचा. याचे उत्तर गटाकडे नव्हते.
त्यामुळे शहरांच्या बाजारपेठा शोधण्यास सुरुवात केली. 

 व्यवस्थापन  
बहुतांश उत्पादन सेंद्रिय पद्धतीने. 
गटातील प्रत्येकाकडे किमान दोन देशी गायी असणे गरजेचे. गोमूत्र व शेणखत वापरावर भर. 
सध्या शंभर कुटुंबांकडे प्रत्येकी दोन देशी गायी. वर्षभराचे गोमूत्र बाटल्यांत साठवले जाते. 
प्रत्येक शेतकरी जवळपास एक हजार लिटरपेक्षा अधिक गोमूत्राचा व दशपर्णी अर्काचाही                  वापर 

 जास्त दर, जागेवरच खरेदी 
 गटातील शेतकरी भापकर- २८ टक्के जास्त दराने मालाची जागेवरच खरेदी.
 हमाली, तोलाई, वाहतूक खर्च नाही. जागेवरच जास्त पैसे मिळत असल्याने शेतकरी समाधानी.
 खरेदी धान्य स्वच्छ करण्याची जबाबदारी त्याच शेतकऱ्यांच्या घरातील महिलांकडे. त्यातूनही त्यांना रोजगार.
 मिनीडाळ-गटातील एकाकडे- त्यासाठी त्याला कर्ज त्याच्याकडून सेंद्रिय डाळीचा पुरवठा. त्यासाठी प्रति किलो दहा रुपये किलोप्रमाणे मोबदला. 
 
 माल नोंदणीसाठी ॲप 

 संपूर्ण शेतकरी गट नावाने (sampurnashetkary) ॲप. 
 गुगल प्ले स्टोअरवरून तीन हजारांपेक्षा अधिकांकडून ते डाऊनलोड केले आहे.

 ॲपचे फायदे  
उपलब्ध माल, वजन, त्याची किंमत कळते.
घरपोच धान्य मागणी नोंदवता येते. त्याचे ठिकाण कळते. त्वरीत मागणी करणाऱ्यांना माल कधी पोच होईल याची माहिती होते. नियमित ग्राहकांना दरात काही टक्के सवलत. काहीवेळा शंभर रुपये किमतीचा भाजीपालाही धान्यासोबत मोफत. 

विक्री साह्य  
तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, श्रीकांत जावळे, उमेश डोईफोडे यांच्या मदतीने कृषी विभाग, अन्न व औषध प्रशासनकडून प्रमाणपत्र. 
नगरला भरणाऱ्या साईज्योती स्वंयसहायता बचत गट, कृषी विभागाच्या कृषी महोत्सवातून सेंद्रिय धान्याची विक्री.
पुण्यात भरणाऱ्या भीमथडी प्रदर्शनातूनही विक्री. 
 
 ज्योती यांनी नाकारली नोकरी 
गटाचे अध्यक्ष संतोष यांच्या पत्नी ज्योती यांचे माहेर श्रीगोंदा आहे. त्या एमएसस्सी ऑरगॅनिक आहेत. सन २०१३ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन रायगड जिल्ह्यात नायब तहसीलदारपदी नियुक्तीची निश्‍चित झाली. मात्र गटासाठीच काम करण्याचे ध्येय ठेवत त्यांनी नोकरी नाकारली. सध्या विक्री व्यवस्थेची जबाबदारी त्या पाहतात. 

भविष्यातील नियोजन
देशी तुपाची निर्मिती व विक्री 
शेतीला उद्योगाचे स्वरूप देऊन तसाच प्रसार 
रासायनिक अवशेषमुक्त अन्न निर्यातीपेक्षा भारतीयांनाच खाऊ घालणार 

 : संतोष भापकर, ९४०४३८८००८ 
 : ज्योती भापकर, ९४२३००४०३९

पूर्वी कडधान्याला सक्षम बाजारपेठ नव्हती. ती त्रुटी भरून निघाली आहे. ग्राहकांना दर्जेदार, सेंद्रिय मालाचा पुरवठा केला व विक्री व्यवस्था उभी केली तर उत्पन्न वाढते हे अनुभवण्यास येत  आहे. 
- बाळासाहेब चौधरी,  उत्तम भापकर, अशोक कुताळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com