थंडीत मोठी घट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

गाेंदियात १३ अंश सेल्सिअस तापमान 
पुणे - श्रीलंका ते दक्षिण कोकणाच्या समुद्र किनारपट्टीवर कमी दाबाच्या पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील थंडीत चांगलीच घट झाली. विदर्भातील गोंदियामध्ये मंगळवारी (ता.१५) राज्यातील सर्वात कमी म्हणजेच १३.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून अशीच स्थिती अजून तीन दिवस कायम राहील, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

गाेंदियात १३ अंश सेल्सिअस तापमान 
पुणे - श्रीलंका ते दक्षिण कोकणाच्या समुद्र किनारपट्टीवर कमी दाबाच्या पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील थंडीत चांगलीच घट झाली. विदर्भातील गोंदियामध्ये मंगळवारी (ता.१५) राज्यातील सर्वात कमी म्हणजेच १३.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून अशीच स्थिती अजून तीन दिवस कायम राहील, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. तर, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यातील प्रमुख शहरापैकी गोंदियामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. दक्षिण कोकण किनारपट्टीवर तयार झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. केरळ आणि कर्नाटकपासून ०.९ ते १.५ किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे येत्या बुधवारपर्यंत (ता.१७) पुण्याच्या आसपासच्या परिसरात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून (ता.१७) आकाश मुख्यतः हा निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 

मंगळवार (ता.१५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात किमान तापमानातील तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.४, जळगाव १३.२ (-२), कोल्हापूर २०.७ (३), महाबळेश्‍वर १६.३ (२), मालेगाव १४.६, नाशिक १३.६, सांगली १८.१ (१), सातारा १७.३ (१), सोलापूर २०.२(२), सांताक्रूझ १९.६ (-२), अलिबाग २०.८(१), रत्नागिरी २२.९ (१), डहाणू १९.८ (-१), भिरा २०.५(१), अौरंगाबाद १६.० (१), परभणी १७.१, नांदेड १९.५ (५), अकोला १५.२ (-२), अमरावती १४.६ (-३), बुलडाणा १५.६ (-१), चंद्रपूर १७.२, गोंदिया १३.० (-४), नागपूर १३.० (-३), वर्धा १५.६ (-१), यवतमाळ १४.० (-३)

अॅग्रो

२० ऑगस्ट हा राजीव गांधी यांचा जन्मदिवस २००४ पासून अक्षय ऊर्जा दिन म्हणून साजरा केला जातो. पारंपरिक ऊर्जा स्रोत हे लवकरच संपुष्ठात...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

जालना जिल्ह्यात सुरवातीपासूनच सार्वत्रिक पाऊस नाही. तालुकानिहाय आकडे काही अंशी बरे दिसत असले तरी पिकाला पोषक असा पाऊस झालाच नाही...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

महाविद्यालयात पंचवीस वर्षांपासून गणित शिकविणाऱ्या प्रा. सोमनाथ घुले यांनी गिरणारे (जि. नाशिक) येथील वडिलोपार्जित शेतीचे गणित...

रविवार, 20 ऑगस्ट 2017