शेतकऱ्यांचा देशभर रास्ता, रेल रोको

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबविली

चंडीगड/जयपूर/भोपाळ/कटक/पाटणा - शेतकरी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि मंडसोर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या पोलिस गोळीबाराचा निषेध करण्यासाठी देशातील ६२ शेतकरी संघटनांनी शुक्रवारी (ता. १६) रास्ता आणि रेल रोकोची हाक दिली होती. तीन तास राष्ट्रीय महामार्गांवर आंदोलन करण्याच्या या निर्णयास हरियाना, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि ओडिशामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांना या वेळी पोलिसांनी ताब्यात घेतले.

नवनिर्माण कृषक संघटनेच्या (एनकेएस) बॅनरखाली असलेल्या विविध शेतकऱ्यांनी ओडिशात दोन तासांचा प्रतीकात्मक बंद केला.

मध्य प्रदेशात राष्ट्रीय किसान मजदूर संघाच्या (आरकेएमएस) नेतृत्वाखाली विविध जिल्ह्यांमध्ये रस्ते रोखले.

आरकेएमएसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार शर्मा यांना जबलपूर-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर रोखण्यासाठी सात शेतकऱ्यांसह अटक करण्यात आली.
हरियाणातील भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) गुरनाम सिंग यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अंबालाजवळ ट्रॅक्टर उभे करून महामार्ग रोखून धरला. आंदोलकांनी रोहटक-पानीपत महामार्गावर घिलोर गावाजवळ आंदोलन केले.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (एम), आप, भारतीय राष्ट्रीय लोकदल (आयएनएलडी), कॉंग्रेससह विविध पक्षांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. 

माजी कृषी राज्यमंत्री जसविंदर संधू यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कराळ येथे आंदोलन मोर्चा काढला.

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कुरुक्षेत्रातील ''किसान पंचायत'' आयोजित केली.

राजस्थानमध्ये गंगानगर-हनुमानगढ महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले.

भुवनेश्वरमध्ये एनकेएसच्या कार्यकर्त्यांनी  रेल्वे स्टेशनवर ''रेल रोको''चे नेतृत्व केले.

संबलपूरमधील राष्ट्रीय महामार्गावर चौधरी चौक येथे शेतकऱ्यांनी नाकेबंदी केली.

शेतकऱ्यांना कर्जमाफीसह शेतीमालास रास्त दर ही आमची प्रमुख मागणी आहे. तसेच केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोग लागू करण्यासंदर्भातही त्वरित पावले उचलावीत.
- त्रिलोक गोठी, उपाध्यक्ष, राष्ट्रीय किसान मजदूर संघ

अॅग्रो

अमेरिकेच्या मध्य पूर्व विभागातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोयाबीनवरील तांबेरा (रस्ट) हा रोगाचा फारसा अनुभव नसला तरी...

09.54 AM

गोठ्यातील सूक्ष्म निरीक्षणाद्वारे व्यवस्थापनामध्ये सुधारणा करता येतात, आजार टाळता येतात, उत्पादनातील घट टाळता येते. म्हणून दररोज...

09.48 AM

खाद्यतेलाच्या गरजा भागवण्यासाठी तेलबिया प्रक्रिया उद्योग ग्रामीण तसेच शहरी भागात सुरू झाले आहेत. काही भागात मोठ्या प्रमाणावर तेल...

09.48 AM