आरोग्यास लाभदायी फलाहार

डॉ. विनिता कुलकर्णी
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

पौष्टिक आहार जसा महत्त्वाचा असतो, तसाच फलाहारही महत्त्वाचा असतो. काही फळे औषध म्हणूनही कार्य करतात. फळांचा रस, फळांच्या साली, काही फळांच्या बियासुद्धा आरोग्यदायी असतात.

पौष्टिक आहार जसा महत्त्वाचा असतो, तसाच फलाहारही महत्त्वाचा असतो. काही फळे औषध म्हणूनही कार्य करतात. फळांचा रस, फळांच्या साली, काही फळांच्या बियासुद्धा आरोग्यदायी असतात.

डाळिंब : डाळिंब पित्तशामक आहे. वारंवार पित्ताचा त्रास होत असेल, तर डाळिंब भरपूर प्रमाणात सेवन करावे. थकवाही कमी होतो. मोठ्या आजारानंतर थकवा, घशाला कोरड पडणे, गळून जाणे ही लक्षणे दिसून येतात. अशावेळी डाळिंबाचे दाणे रोज खावेत किंवा रस सेवन करावा. हृदयाला हितकर असे डाळिंब वृद्धापासून बालकांपर्यंत सर्वांनी सेवन करावे. डाळिंबाच्या फळाची साल, १/४ चमचा सुंठ, बडीशेप घालून पाणी उकळावे. हे पाणी सेवन केल्यास वारंवार होणारे जुलाब लवकर थांबतात. पोटदुखी कमी होते. डाळिंबाचा रस, जिरेपूड आणि साखर घालून सेवन केल्यास अजीर्णावर चांगला परिणाम होतो.

जांभूळ : मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी जांभळे रोज खावीत. विशेषतः बियांचे चूर्ण यासाठी फायदेशीर असते. म्हणून जांभळाच्या हंगामात हे चूर्ण करून ठेवावे किंवा काष्ठौषधीच्या दुकानातून आणून ठेवावे. जांभळाचे झाड जवळपास असेल तर त्याची कोवळी पाने उलट्यांवर उत्तम काम करतात. पानांचा रस मधासह द्यावा. जुलाब, आव पडणे अशा लक्षणांत पानांचा काढा उपयोगी पडतो. तोंड आले असल्यास जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्या केल्यास उपयोग होतो. अर्थातच या सर्व लक्षणांची कारणे शोधून पोटात औषधे घेणे आवश्यक असतेच.

केळी : केळी अतिशय फलदायक म्हणून काम करते. पण ज्यांची पचनशक्ती मंद आहे आणि ज्यांना कफाचा त्रास भरपूर होतो त्यांनी प्रथम त्रास कमी करावा. त्यानंतर केळी खावीत. व्यवस्थित पिकलेली सोनकेळी तुपासमवेत सेवन केल्यास थकवा कमी होतो. वजन वाढते.

सफरचंद : आम्लपित्त, अन्न घशाशी येणे, तोंडाला पाणी सुटणे, अजीर्णाचा त्रास या सर्व लक्षणांत सफरचंद उत्तम कार्य करते. ज्यांना चावता येत नाही त्यांना रस द्यावा. उष्णता कमी होते, पोट साफ होण्यास मदत होते, अंगातील कडकी, तोंड येणे यासाठी सफरचंद रोज खावे.

संत्री, मोसंबी, कलिंगड, द्राक्ष अशी ऋतूंनुसार उपलब्ध होणारी फळे त्या त्या ऋतूंमध्ये जरूर खावीत. संत्र्याची साल वाळवून सुकवून शिकेकाईत घातल्यास केसांसाठी चांगला फायदा होतो. सीताफळांच्या बियांचे चूर्ण केसाच्या मुळाशी लावल्यास उवांचे प्रमाण कमी होते.

फळे सेवन करताना सर्वांत महत्त्वाची दक्षता घ्यायची म्हणजे, फळे+दूध एकत्र करून खाऊ नयेत. त्यामुळे सीताफळ रबडी, मिल्कशेक, शिकरण यात फळे असली, तरी दुधाशी संयोग झाल्याने पुढे त्रासदायक लक्षणे निर्माण होतात.

अॅग्रो

शेती, मग ती अल्प असली तरी महागाईच्या व समस्यांच्या काळात कसणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील तरोडा येथील साबळे...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017

पिकांच्या चांगल्या वाढीसाठी तण नियंत्रण आणि आंतरमशागत अत्यंत आवश्यक असते. यासाठी बैलचलित सुधारित यंत्राचा वापर केल्यास श्रम आणि...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या काढणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाने ‘कांदा प्रतवारी, लोडिंग-...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017