उसात बहरलाय हरभरा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

नळेगाव - परिस्थितीवर मात करीत पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून उसाच्या पिकामध्ये हरभरा घेऊन चाकूर तालुक्‍यातील हुडगेवाडी येथील शेतकरी चंद्रकांत बापूराव पाटील यांनी आंतरपिकाचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यामधून त्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

तंत्रज्ञानाच्या युगात शेतीत नवनवीन प्रयोग केले जात आहेत. कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घेतले जात आहे. असाच प्रयोग श्री. पाटील यांनी केला. हुडगेवाडी शिवारातील जमीन चांगल्या प्रतीची असली तरी कायम पाण्याची व्यवस्था नसल्याने व चार वर्षापासून या भागात पडलेला कमी पाऊस यामुळे शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. हे शिवार घरणी मध्यम प्रकल्पाच्या बाजूला येतो. यावर्षीच्या पावसाने प्रकल्पात भरपूर पाणी आले आहे. येथील शेतकरी श्री. पाटील यांच्याकडे २० एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यांनी आठ एकरावर चार फुटाची सरी मारून उसाची लागवड केली आहे. चार फुटाच्या सरीतील अंतरात टोकन पद्धतीने जॅकी जातीच्या हरभरा पिकाची लागवड केली आहे. या संपूर्ण शेतीला तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. लागवडीच्या अगोदर बीज प्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना हरभरा आंतरपिकातून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

योग्य नियोजन केल्यास शेती फायद्याचीच ठरते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवता येते. पाणी व्यवस्थापनासाठी तुषार, ठिबकचा वापर करावा.
- श्रीमंत भताने, कृषी सहायक

योग्य नियोजन केल्यास शेती फायद्याचीच ठरते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवता येते. पाणी व्यवस्थापनासाठी तुषार, ठिबकचा वापर करावा.
- श्रीमंत भताने, कृषी सहायक

Web Title: Interculture experiment