इस्राईलच्या कृषी प्रदर्शनात नव तंत्रज्ञानाचा जागर

दिलीप वैद्य
गुरुवार, 10 मे 2018

तेल अवीव, इस्राईल - येथे होत असलेल्या 'अॅग्रीटेक २०१८' या जागतिक कृषी प्रदर्शनाचा बुधवारी (ता. ९) दुसरा दिवस होता. महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शन ११ दालनात आणि १२०० स्टॉल्समध्ये सुरू आहे. शेतीतील तंत्रज्ञानाचे नवनवीन शोध पाहण्यासाठी जगभरातून येथे प्रदर्शनार्थी आले अाहेत. प्रदर्शनाचा आज (ता.१०) शेवटचा दिवस आहे.

प्रदर्शनात सिंचनाकरिता लागणारे व्हॉल्व्ह, ऑटोमेशन सिस्टिम, फिल्टर्स यांची उपकरणे आहेत. विजेशिवाय मोबाईलवर चालणारे व्हॉल्व्ह हे प्रमुख आकर्षण होते. विविध प्रकारच्या मिरच्या, द्राक्षे, भाज्यादेखील येथे आहेत. प्रदर्शनात भारतासह चीन, इस्राईल, अमेरिका आणि युरोपसह जगभरातील नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत. जळगावच्या जैन इरिगेशन कंपनीचा मोठा स्टॉल या प्रदर्शनात आहे. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे स्वागत करीत होते.

कांचन गडकरी यांचीही भेट
नागपूरच्या ॲग्रोव्हिजन ग्रुपच्या माध्यमातून ४२ जण प्रदर्शन पाहण्यासाठी आले आहेत. यात १३ महिला शेतकऱ्यांसह केंद्रीय सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी, अॅग्रोव्हिजनचे कोशाध्यक्ष रमेश मानकर, गौरी चंद्रायन, साधना रक्षमवार, सहकार भारतीच्या महिला प्रमुख संध्या कुळकर्णी, अंजली राऊत, नीलिमा बावले यांचा समावेश आहे.

Web Title: israel agriculture exhibition new technology agritech 2018