राज्यात उष्णतेची लाट, हवामान कोरडे राहील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भ व मराठवाड्याचे पश्चिम भागावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. उर्वरित महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. दि. २ व ३ एप्रिल रोजी पुन्हा हवेच्या दाबात बदल होतील. संपूर्ण विदर्भ व मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. तशीच परिस्थिती दिनांक ६ एप्रिलपर्यंत राहण्याची शक्यता आहे. दि. ७ एप्रिल रोजी पश्चिम विदर्भ व पश्चिम मराठवाड्यावरील हवेचे दाब कमी होत असून १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब होईल. पश्चिम भागावर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भ व मराठवाड्याचे पश्चिम भागावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. उर्वरित महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. दि. २ व ३ एप्रिल रोजी पुन्हा हवेच्या दाबात बदल होतील. संपूर्ण विदर्भ व मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. तशीच परिस्थिती दिनांक ६ एप्रिलपर्यंत राहण्याची शक्यता आहे. दि. ७ एप्रिल रोजी पश्चिम विदर्भ व पश्चिम मराठवाड्यावरील हवेचे दाब कमी होत असून १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब होईल. पश्चिम भागावर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्याची शक्यता आहे. 

१) कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी, मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली, विदर्भात बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यात हवामना ढगाळ राहील. 
२) उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १५ ते १९ किलोमीटर इतका अधिक राहील. लातूर, नांदेड, बीड, हिंगोली व बुलडाणा जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी १२ ते १४ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य व अग्नेयेकडून राहील. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. 
३) धुळे, नंदुरबार, जळगाव संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्यात विदर्भातील अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, सांगली, सातारा, सोलापूर व नगर जिल्ह्यांत कमाल तापमानात वाढ होऊन ४१ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. किमान तापमानात वाढ होऊन लातूर, हिंगोली, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, सोलापूर, नगर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. 

कोकण - 
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ६१ टक्के, तर रायगड जिल्ह्यात ७७ टक्के राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. ठाणे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. 

उत्तर महाराष्ट्र - 
उत्तर महाराष्‍ट्रातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. नंदुरबार जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. जळगाव जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २३ टक्के राहील. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ३१ ते ३४ टक्के राहील. तर नाशिक जिल्ह्यात ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ किलोमीटर राहील. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. 

मराठवाडा - 
मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. लातूर, नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमना ४३ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमानात होत असलेली वाढ मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनाचा वेग वाढवेल. हिंगोली जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस, लातूर व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस, बीड जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्‍सिअसपर्यंत वाढेल. तर उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात ढगांचे प्रमाण अधिक राहील. लातूर, नांदेड व बीड जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १७ ते २६ टक्के इतकी कमी राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते १२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १९ किलोमीटर राहील. वाऱ्याचा वेग १४ किलोमीटरहून अधिक उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यांत राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून व वायव्येकडून राहील. पावसाची शक्यता नाही. 

पश्चिम विदर्भ - 
वाशीम जिल्हात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस बुलडाणा जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, अमरावती जिल्ह्यात किमान तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. तर उर्वरित तीनही जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा, अमरावती व वाशीम जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. अकोला जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १८ ते २९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते ११ टक्के सर्वच जिल्ह्यांत राहील. त्यामुळे सकाळचे व दुपारचे हवामान अत्यंत कोरडे राहील. बुलडाणा जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १४ किलोमीटर राहील. तर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. वाशीम जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्येयेकडून तर उर्वरित जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. 

मध्य विदर्भ - 
यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस, किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस राहील. नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस, किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २९ ते ३५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता केवळ १० टक्के इतकी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. 

पूर्व विदर्भ - 
चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत ३७ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस, गडचिरोली जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ५७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. चंद्रपूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. 

दक्षिण पश्चिम महाराष्ट्र - 
दक्षिण पश्मिच महाराष्ट्रातील नगर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअस, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व नगर जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत २१ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. नगर व सोलापूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष सेल्सिअस ३३ ते ३६ टक्के, पुणे जिल्ह्यात ५४ टक्के, सांगली जिल्ह्यात ५६ टक्के, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ७२ ते ८८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर जिल्ह्यात ताशी १७ किलोमीटर राहील. उर्वरित जिल्ह्यात ४ ते ११ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्य व नैर्ऋत्यकडून राहील. 

कृषी सल्ला - 
१) द्राक्ष खरड छाटणीची वेळ जवळ आली असल्याने बागेची स्वच्छता करावी. 
२) संत्रा, मोसंबी बागेत पालापाचोळा,गव्हाचा भुसा याचे आच्छादन करावे. 
३) नारळ रोपांना सावली करावी. 
४) कलिंगड, खरबूज पिकास पाणी देताना ठिबक सिंचनाचा कालावधी वाढवावा. 
५) हळद पॉलिश करून सुरक्षित स्थळी ठेवावी. 

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ आणि सदस्य, संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 

Web Title: maharashtra temreture