कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'

Marathi news agriculture news in Marathi Agrowon news Onion news
Marathi news agriculture news in Marathi Agrowon news Onion news

नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि सट्टेबाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांद्यावरील स्टॉक लिमिटला (साठा मर्यादा) डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी ट्‌विटरद्वारे यास दुजोरा दिला आहे.

देशात सध्या दिवाळी हा वर्षातील सर्वांत मोठा सण साजरा केला जात आहे. परतीच्या पावसाचा कांद्याला बसलेला फटका आणि सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कांदादर वधारत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आगामी काळात हे दर आणखी वाढून जनसामान्यांचा रोष पत्करावा लागू नये यासाठी कांदा साठवणुकीवर मर्यादा घातलेली मर्यादा डिसेंबर २०१७ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री पासवान यांनी या संदर्भात ट्विट केले असून, ३१ आक्टोबरला संपणारी कांद्यावरील साठा मर्यादा ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत कायम राहील, असे म्हटले आहे.

आॅगस्ट महिन्यात दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कांद्यावर स्टॉक लिमिटच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या होत्या. तसेच याविषयी अधिसूचना काढून साठेबाजांवर कारवाई करण्याचे अधिकारही राज्यांना देण्यात आले होते. देशातून यंदा कांदा निर्यातही वाढली आहे. परिणामी आवक कमी होऊन कांदादर वधारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कांदा निर्यात (टनांमध्ये)
वर्ष निर्यात
२०१६-१७ ७,८८,२५७
२०१७-१८ १२,२९,५१०

(निर्यात कालावधी : एप्रिल ते जुलै)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com