भरतभाईंनी तयार केले  आंतरमशागत, पेरणी यंत्र

भरतभाईंनी तयार केले  आंतरमशागत, पेरणी यंत्र

गुजरात राज्यातील पिखोर (ता. केशोद, जि. जुनागड) या लहानशा गावातील भरतभाई अग्रावत हे शेतीसाठी लागणाऱ्या छोट्या अवजारे निर्मितीतील संशोधक. भरतभाईंचे वडील अमृतभाई यांचा गावामध्येच लहानसा फॅब्रिकेशनचा व्यवसाय. त्यामुळे गावपरिसरातील शेतकऱ्यांच्या अवजारांची दुरुस्ती त्याचबरोबरीने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लहान अवजारे तयार करून देत होते. वडिलांच्या बरोबरीने लहानपणापासून अवजारे, यंत्रे दुरुस्ती करता करता भरतभाईंनादेखील नवीन संकल्पना सुचू लागल्या. यातूनच त्यांनी शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन छोट्या अवजारांची निर्मिती सुरू केली. 

भरतभाईंनी ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन कूक स्टोव्ह, पाणी उपसण्यासाठी लहान पवनचक्की तयार केली. याचबरोबरीने आंतरमशागत आणि पेरणीसाठी  मजुरांची कमतरता आणि लहान शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन अांतरमशागत आणि पेरणी यंत्राचीदेखील निर्मिती केली. या यंत्राला शेतकऱ्यांच्याकडून चांगली मागणी  आहे. हे यंत्र विकसित करण्यासाठी ग्यान संस्थेने त्यांना तांत्रिक आणि आर्थिक मदत केली आहे.

यंत्राने आंतरमशागत करता येते. तसेच गहू, भुईमूग, मका हरभरा सोयाबीन, एरंडी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, जिरे, बाजरी, तीळ, कापूस या पिकांची पेरणी करता येते.
दोन व्यक्तिंच्या सहाय्याने यंत्राने आंतरमशागत आणि पेरणी शक्य.
गरजेनुसार यंत्रातील पेरणीचे अंतर बदलणे शक्य आहे.
यंत्राला असलेल्या बियाणे टाकीची क्षमता तीन किलो.
यंत्राने एकावेळी एका ओळीत पेरणी करता येते.
यंत्राला दोन्ही बाजूने लहान सायकलची दोन चाके लावलेली आहेत. यंत्राची चाके आणि बियाणे टाकी एचडीपीची बनविलेली आहे.  हॅन्डेल आणि यंत्राचे इतर भाग लोखंडाचे आहे.
बियाणे टाकीला रोटर जोडलेले आहेत. चाकामुळे यंत्र शेतात चालविण्यास सुरवात झाल्यानंतर रोटर फिरतात. त्यामुळे बियाणे योग्य अंतरावर पडत जाते. बियाणे प्रकार, पेरणीचे अंतर, पेरणीच्या खोलीनुसार रोटर बदलावे लागतात. यंत्रासोबत चार प्रकारचे रोटर उपलब्ध आहेत.  

पेरणी यंत्रासोबत तण नियंत्रणासाठी अवजार, बियाणे आकार आणि पेरणीच्या अंतरानुसार वेगवेगळे रोटर उपलब्ध, बियाणे पेरणीपूर्वी जमिनीत छिद्र घेण्यासाठीचे छोटे अवजार तसेच बियाणे पेरणीनंतर माती झाकण्याचे छोटे अवजार यास जोडता येते. 

यंत्राची किंमत २७०० रुपये आहे. पेरणीयंत्रासोबत इतर जोडणीची अवजारे नको असतील तर किंमत २४०० रुपये आहे.

०७९-२६७६९६८६ (ग्यान संस्था, अहमदाबाद, गुजरात)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com