दूध दरवाढीचा निर्णय ठरला फुसका बार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

खासगी, सहकारी संघांकडून जुन्याच दराची अंमलबजावणी 

खासगी, सहकारी संघांकडून जुन्याच दराची अंमलबजावणी 

जळगाव - गायीच्या दूध खरेदीदरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय खासगी व सहकारी दूध संघ कृती समितीने नुकताच घेतला. त्यानुसार ११ जानेवारीपासून राज्यभर दरवाढ होण्याच्या अपेक्षेने दूध उत्पादक बसले असताना, अद्याप कोणत्याच संघाकडून त्या दिशेने पाऊल उचलण्यात आलेले नाही. दूध दरवाढीचा निर्णय निव्वळ फुसका बार ठरला आहे. 
महाराष्ट्र राज्य खासगी आणि सहकारी दूध संघ कृती समितीची बैठक आठ जानेवारीला पुणे येथील जिल्हा सहकारी दूध संघात पार पडली. राज्यभरातील विविध खासगी आणि सहकारी दूध संघांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. त्यात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार गायीच्या दूध खरेदीदरात प्रतिलिटर तीन रुपये तर विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचे एकमताने ठरले. नवीन दरवाढ ही ११ जानेवारीपासून लागू होईल, असेही स्पष्ट करण्यात आले. 

 
शासन पातळीवर गायीच्या ३.५ फॅट व ८.५ टक्के एसएनएफ दुधाला २२ रुपयांपेक्षा कमी दर मिळत नसताना कृती समितीने स्वतःच्या अधिकारात भरघोस दूध दरवाढ जाहीर केली, त्यामुळे जाहीर केलेली उत्पादकांमध्ये समाधानही व्यक्त करण्यात आले. प्रत्यक्षात दरवाढ लागू करण्याची वेळ आली तेव्हा कोणत्याच संघाने त्या दृष्टीने नवीन दर उत्पादकांना देऊ केले नाहीत. कृती समितीच्या निर्णयाचा हवाला देऊन दरवाढीचे काय झाले म्हणून विचारणा केल्यावर आम्ही शासन निर्णयाला बांधिल आहोत, अशी उत्तरे दूध उत्पादकांना मिळू लागली. साहजिक कृती समितीने घेतलेला दूध दरवाढीचा निर्णय निव्वळ फुसका बार ठरला. 

गुजरातचा आदर्श कधी घेणार? 
गुजरातमधील अमूलने म्हशीच्या दुधासाठी ४८ रुपये प्रतिलिटरपर्यंत दरवाढ लागूसुद्धा केली आहे. त्याचा फायदा सुमारे ६.५२ लाख दूध उत्पादकांना मिळू लागला आहे. त्यातुलनेत महाराष्ट्रात एकीकडे दूध उत्पादकांच्या बाबतीत शासन गंभीर नाही, दुसरीकडे खासगी व सहकारी संघ कृती समितीचे निर्णय कोणी गांभीर्याने घेताना दिसत नाही. दूध उत्पादकांचे हित साधण्यासाठी गुजरातचा आदर्श कधी घेणार, असा सवाल त्यामुळे उपस्थित होऊ लागला आहे. 
 
विविध कारणांनी दूध व्यवसायाचे कंबरडे आधीच मोडले आहे. त्यातभर शासन किंवा खासगी, सहकारी संघांकडून उत्पादनखर्चाच्या मानाने दुधाला खरेदीदर मिळणे दुरापास्त झाले आहे. शेतीपूरक जोडधंदे आणि त्यावर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्था त्यामुळे दुबळी झाली आहे. 
- कडूअप्पा पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते, शेतकरी संघटना 

अॅग्रो

कृषी मंत्रालय; गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सात टक्क्यांनी अधिक नवी दिल्ली - देशात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. यामुळे २०१६-...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

विविध नोकरीचे अनुभव विपुल कुलकर्णी (जामखेड, जि. नगर) यांनी घेतले. पण जीवनात स्थैर्य येईना. अखेर पूर्ण क्षमतेने दुग्ध व्यवसाय सुरू...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

उत्पादन खर्च वाढला; दरवाढीची मागणी प्रलंबित प्रदूषण नियमावलीमुळे आसवानी प्रकल्प अडचणीत पुणे - आसवानी प्रकल्पांचे वाढते...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017