दक्षिण कोकणात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

पुणे  - मॉन्सून विदर्भाच्या काही भागात शुक्रवारी (ता.१६) दाखल झाला आहे. माॅन्सून हळूहळू पुढे सरकत असून राज्यात येत्या बुधवार (ता. २१) पर्यंत दक्षिण कोकणच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार, आज (रविवार) दक्षिण कोकणातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. 

शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. तसेच लोणावळा, भिरा, शिरगाव, अंबोणे, दावडी, खोपोली, ताम्हिणी, वळवण या घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस पडला. शनिवारी (ता.१७) मध्य महाराष्ट्रातील पुणे, मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे ओढे, बंधारे भरून वाहू लागले. काही ठिकाणी शेतीमालाचे मोठे नुकसान झाले. 

कोकणातील मालवण, म्हापसा, मुळदे, रत्नागिरी, सांवतवाडी, वेंगुर्ला येथे जोरदार पाऊस झाला. तर पेर्नेम, भिरा, कानकोना, कुडाळ, वल्पई, फोंडा, राजापूर, सुधागडपाली, केपे, रोहा, संगमेश्वर देवरूखे, सांगे, तलासरी येथे मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील खंडाळा, पुणे येथे मुसळधार पाऊस पडला. तर बारामती, कर्जत, सासवड, सातारा, अकोले, आटपाडी, चंदगड, हातकणंगले, खटाववडुज, मोहोळ पाचोरा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर इगतपुरी, इंदापूर, कराड, करमाळा, कोल्हापूर, मालेगाव, नांदगाव, पंढरपूर, पौड, मुळशी, फलटण, येवला येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

मराठवाड्यातील लोहारा, जाफ्राबाद येथे मध्यम ते जोरदार पाऊस पडला. तर बदलापूर, माहूर येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भातील चिमूर, खारंगी, धारणी, नांदगाव, काजी, नंदुर, नेर, यवतमाळ येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर अरनी, भंडारा, चिखली, धामणगाव, जळगाव, जामोद, कळंब, लोणार, मूर्तिजापूर, नरखेड, रामटेक, सिंधखेडराजा येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.