मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

पुणे - विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता.19) सकाळपर्यंत चंद्रपूर येथे 46.2 अंश सेल्सिअसचे उच्चांकी तापमान नोंदविले गेले. रविवारी (ता.21) व सोमवारी (ता.22) मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता, उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्यात शुक्रवार आणि शनिवारी कोरडे हवामान राहील. आजही विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. उष्णतेच्या लाटेमुळे कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर मराठवाड्याच्या काही भागांत व विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. पुणे परिसरातही आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. 

शुक्रवारी (ता.19) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे 
कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे 38.4, जळगाव 42.7, कोल्हापूर 
38.1, महाबळेश्वर 31.7, मालेगाव 43.2, नाशिक 37.8, सांगली 38.1, सातारा 
39.7, सोलापूर 42.7, सांताक्रूझ 34.1, अलिबाग 36.2, रत्नागिरी 34.5, 
डहाणू 35.4, औरंगाबाद 40.6, परभणी 40.0, नांदेड 43.0, अकोला 43.8, 
बुलडाणा 40.5, अमरावती 42.8, चंद्रपूर 46.2, गोंदिया 44.0, वाशीम 41.2, 
नागपूर 45.0, वर्धा 44.6, यवतमाळ 42.5, 

Web Title: Rainfall in Central Maharashtra