चंदन लागवडीच्या प्रोत्साहनासाठी योग्य पावले उचलणार - कृषी आयुक्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

पुणे - चंदन लागवडीविषयी लोकांमध्ये उत्सुकता आहे. शेतकऱ्यांनी काही बाबी लक्षात घेऊन शास्त्रीय दृष्टिकोनातून लागवड करण्याची गरज आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत (एमआयडीएच) असलेल्या क्षेत्र विस्ताराच्या बाबींमध्ये चंदनाचा समावेश करून आगामी काळात प्रोत्साहन देण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी दिले. 

महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ आणि इन्टिट्यूशन आॅफ ऍग्रिकल्चरल टेक्नॉलॉजीस्ट यांच्या वतीने ‘चंदन लागवड- व्यापारी शेती संधी’ या विषयाची कार्यशाळा गुरुवारी (ता. ९) पुणे कृषी महाविद्यालयाच्या शिरनामे सभागृह येथे आयोजित केली होती. त्या वेळी श्री. देशमुख बोलत होते. या वेळी वुड रिसर्च संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. अनंत पद्मनाभन, आयएटीचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण मुळे, माजी कृषी आयुक्त कृष्णाजी लव्हेकर, कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक प्रल्हाद पोकळे, निविष्ठ व गुणनियंत्रण विजयकुमार इंगळे, जयंत देशमुख आदि उपस्थित होते. कार्यशाळेत हवेलीचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण कदम यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी आभार मानले. 

Web Title: sandalwood farming