ओळखा जनावरांमधील सर्पदंश...

गोठ्याची स्वच्छता ठेवल्याने सापांपासून जनावरांना होणारा धोका टळतो.
गोठ्याची स्वच्छता ठेवल्याने सापांपासून जनावरांना होणारा धोका टळतो.

पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात गवताची वाढ मोठ्या प्रमाणात होते. चराई क्षेत्रात सापांचा वावर आढळतो. अशा वेळी जनावरांना सर्पदंशाची शक्यता जास्त असते.  जनावरांना सर्पदंश झाल्यास पशुपालकांच्या लक्षात लवकर येत नाही. ज्या वेळी कुराणात चरत असताना जनावरांना सर्पदंश होतो, अशा जनावराच्या तोंडाभोवती, मानेखाली, कासेवर व खुराच्या मागील बाजूस सर्पदंशाच्या खुणा आढळून येतात. जखमेचा भाग सुजलेला असतो. अशा परिस्थितीमध्ये दुर्लक्ष केल्यास सर्पदंशाच्या मज्जातंतूवर परिणाम होतो. त्यामुळे श्वासोच्छवास बंद होऊन जनावर दगावण्याची शक्यता असते.  

जनावरांना सर्पदंश झाल्यास 
 विषारी सापाने चावा घेतल्यास जनावर सैरभैर धावत सुटते. 
 सर्पदंश तीव्र असल्यास काही मिनिटांत जनावर चारा खाणे बंद करते. 
 डोक्यावर आपटी येते. 
डोळ्याच्या बाहुल्या सुजतात. जनावर मान टाकते. 
 श्वसनास त्रास होतो. तोंडातून फेस येतो. 

उपचार 
 सर्पदंश झाल्यावर जनावराच्या शरीरात विष पसरण्याची शक्यता असते.  
 प्रथम सर्पदंश झालेल्या वरील बाजूस घट्ट दोरी अथवा पट्टी बांधावी. जेणेकरून विष जनावराच्या शरीरात पसरणार नाही. 
 जखम स्वच्छ (निर्जंतुक)पाण्याने धुऊन घ्यावी. अस्वच्छ पाण्याचा वापर टाळावा. 
  सर्पदंश झालेल्या ठिकाणी चाकूने किंवा ब्लेडने कापून रक्त वाहू द्यावे. त्यामुळे विष शरीरात न पसरत रक्तप्रवाहाबरोबर शरीराबाहेर टाकले जाईल. खोलवर जखम होणार नाही याची काळजी घ्यावी. 
  पुरेसा रक्तप्रवाह झाल्यानंतर त्यावर पोटॅशिअम परामॅग्नेट चोळावे, ज्यामुळे रक्तप्रवाह आटोक्यात येईल. 

सर्पदंश टाळण्यासाठी उपाययोजना
 गोठ्यात तसेच गोठ्याच्या परिसरात उंदरांचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घ्यावी. 
 गोठ्याच्या परिसरात अडगळ तयार करू नये. 
 सरपण, गोवऱ्या यांची साठवणूक गोठ्यापासून दूर करावी. 
 पावसाळ्यात गोठ्याच्या परिसरात गवतांची वाढ टाळावी. 
 कुराणात जनावरांना चरण्यासाठी घेऊन जाणे टाळावे. 
 कुराणातून चारून आल्यानंतर जनावरांचे व्यवस्थित निरीक्षण करावे. सर्पदंश झालेला असल्यास सर्पदंशाच्या खुणा आढळून येतात, जखमेचा भाग सुजलेला असतो. लगेच पशूतज्ज्ञांकडून उपचार करावेत.
- अजय गवळी, ८००७४४१७०२ (पशुजैवतंत्रज्ञान विभाग, के. के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com