सोलापुरात कारखानदारांची स्पर्धा सुरूच, आता "सिद्धेश्‍वर' देणार 2700 रुपये

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारांमध्ये ऊसदरावरून चांगलीच स्पर्धा रंगली आहे. उत्तर सोलापुरातील सिद्धेश्‍वर साखर कारखान्याने पहिली उचल 2400 रुपये देण्याचा निर्णय घेतल्यानंतर याच भागातील लोकमंगलने पहिली उचल 2500 रुपये जाहीर केली. आता त्याही पुढे जाऊन सिद्धेश्‍वरने आपल्या निर्णयात बदल करून जानेवारी महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्याने ऊस उत्पादकांना दोन हजार 700 रुपये देण्याचे कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी जाहीर केले आहे.

श्री. काडादी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लोकमंगल साखर कारखान्याने 5 नोव्हेंबरला दोन हजार 200 रुपये पहिली उचल जाहीर केली होती. सिद्धेश्‍वर साखर कारखान्याने 8 नोव्हेंबरला दोन हजार 400 रुपयांपर्यंत पहिली उचल देण्याचे जाहीर केले. त्यानंतर लोकमंगल कारखान्याने 10 नोव्हेंबरला दोन हजार 500 रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर केले. लोकमंगलने घेतलेल्या या निर्णयामुळे सिद्धेश्‍वर साखर कारखान्याने त्यापुढे एक पाऊल टाकत दोन हजार 500 रुपये पहिली उचल व त्याचबरोबर जानेवारीअखेरपर्यंत प्रतिटन दोन हजार 700 रुपये देण्याचे जाहीर केले. जिल्ह्यात ऊस नसल्यामुळेच कारखानदारांमध्ये ही स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सिद्धेश्‍वर कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या उसाला नोव्हेंबरअखेरपर्यंत दोन हजार 500 रुपये, 1 डिसेंबरपासून दोन हजार 550, 16 डिसेंबरपासून दोन हजार 600, 1 जानेवारीपासून दोन हजार 650 तर 16 जानेवारीपासून दोन हजार 700 रुपये पहिल्या हप्त्यापोटी देण्याचा निर्णय कारखान्याने घेतला आहे.
 
अॅग्रो

नाशिकला १ ते ३, तर सोलापूरला १५, १७ सप्टेंबरला प्रदर्शनाचे आयोजन पुणे - द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नवनवीन...

10.15 AM

शेळ्या पारंपरिकरीत्या प्रामुख्याने मांस किंवा मटणासाठी पाळल्या जातात. मात्र त्यांच्या मांस, लेंडीखतासोबतच दूधही महत्त्वपूर्ण आहे...

10.12 AM

कांद्यावर प्रक्रिया केल्यामुळे पदार्थ जास्त काळापर्यंत साठवून ठेवता येतात. कांद्याच्या पदार्थांची निर्यातही शक्‍य होते. त्यासाठी...

10.09 AM