अकोल्यात तूर, हरभऱ्याचे भाव पाडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

अकोला  - तूर, हरभऱ्याचे हमीभाव शासनाने जाहीर केले. त्यापेक्षा कमी दरात खरेदी केल्यास कारवाईचा इशारा शासनाने दिला आहे. सध्या खासगी बाजारात सर्रास हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी सुरू आहे. तूर तसेच हरभऱ्याला प्रतिक्‍विंटल तीन हजार ते तीन शंभर रुपये दर दिला जात आहे.

शासनाने तुरीसाठी पाच हजार ४५०; तर हरभऱ्यांसाठी चार हजार २०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यापेक्षा कमीदरात खरेदी करू नये, असे आदेशच दिले. शासनाच्या आदेशानंतरही खासगी बाजारात हमीभावापेक्षा कमी दरात तूर व हरभऱ्याची खरेदी सुरू आहे. जिल्ह्यात गोदामात जागा नसल्याने शासकीय खरेदी जवळपास बंद झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी बाजारात तूर, हरभरा विक्रीसाठी घेऊन जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या याच अडचणीचा फायदा घेत शेतकऱ्यांना आणखी अडचणीत पकडल्या जात आहे. खासगी बाजारात तूर तर पार कोसळले आहे. साडेपाच हजारांवरून तीन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर खाली आले. अशीच स्थिती हरभऱ्याची आहे. शासनाने हरभऱ्याची दर चार हजार २०० व बोनस असे चार हजार ४०० रुपये जाहीर केले. मात्र, नाफेडची खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांची अडवणूक सुरू आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Web Title: Tur Harbhara price less in akola