अहमदनगर : ठेकेदाराने परस्पर उरकले रस्त्याचे काम

महापालिकेने बजावली नोटीस, कारवाई करणार
Ahmednagar muncipal corporation
Ahmednagar muncipal corporationSakal

अहमदनगर - कामाचा दर्जा योग्य नसल्याने सुरू असलेले रस्त्याचे काम तातडीने थांबवावे, असे आदेश शहर अभियंता सुरेश इथापे यांनी संबंधित ठेकेदाराला दिले. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवत ठेकेदाराने सुटीच्या दिवशी परस्पर हे काम उरकून घेतले. सावेडीत प्रभाग क्रमांक पाचमधील भाग्योदय कॉलनीत हा प्रकार घडला. या प्रकरणी शहर अभियंता इथापे यांनी ठेकेदार कंपनीला नोटीस बजावली.

‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ अशी महापालिकेची अवस्था झाली आहे. बेस्ट कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीला प्रभाग क्रमांक ५ मधील कुष्ठधाम येथील ओढ्याचे सुशोभीकरण करणे, तसेच रस्त्यांची व पेव्हिंग ब्लॉकची कामे देण्यात आली. परंतु कार्यारंभ आदेश देवूनही ठेकेदार कंपनीने सहा महिने काम सुरू केले नाही. त्यानंतर एक दिवस अचानक भाग्योदय कॉलनीमधील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले. शहर अभियंता सुरेश इथापे व सुपरवायझर, संबंधित अभियंता यांनी कामाची पाहणी केली. काँक्रिटीसाठी वापरले जाणारे साहित्य उच्च दर्जाचे नव्हते. सिमेंटचे प्रमाणही कमी होते. इथापे यांनी तातडीने हे काम थांबवले. त्यानंतर ठेकेदार कंपनीने कोणतीही पूर्वकल्पना न देता सुटीच्या दिवशी घाईघाईत हे काम उरकून घेतले. या प्रकरणी इथापे यांनी ठेकेदार कंपनीला नोटिस बजावली. दर्जाहीन काम करून महापालिकेची फसवणूक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com