अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना सानुग्रह अनुदान

पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश : योजनेत सुधारणा
Sanugrah grant to accident Student
Sanugrah grant to accident StudentSakal

अहमदनगर - शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्यांच्यासाठी विमा कंपन्यांऐवजी शासनाच्या वतीने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गंत अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना किंवा पालकांना विविध टप्प्यांत मदत जाहीर करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोचलेल्या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी सुरक्षा योजना विमा कंपन्यांमार्फत २००३ पासून राबविण्यात येत होती. यासाठी विम्याचे हप्ते एकत्रितरीत्या शासनाकडून देण्यात येत होते. विमा कंपन्या विविध कारणे सांगून विद्यार्थ्यांना भरपाई देण्याबाबत टाळाटाळ करीत होत्या. त्यामुळे संबंधित योजना बंद करून त्याऐवजी सानुग्रह अनुदान योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत या योजनेची अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे पालकांना, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. अपघातांचे वाढते प्रमाण, वाढती महागाई विचारात घेता, या योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अनुदानाचे प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक व मुख्याध्यापक किंवा गटशिक्षणाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांची राहणार आहे. अर्ज निकाली काढण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली असून, त्यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, शिक्षणाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आदी अधिकाऱ्यांचा समावेश असतो.

मिळणारे सानुग्रह अनुदान

विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास १५००००

अपघातामुळे अपंगत्व आल्यास १०००००

१ अवयव किंवा १ डोळा निकामी ७५०००

अपघातामुळे शस्त्रक्रिया - रुग्णालयाचा खर्च किंवा १०००००

आजारी पडून, सर्पदंशाने मृत्यू १५००००

कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास - रुग्णालयाचा

खर्च किंवा १०००००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com