सोलापूर विभागातर्फे विशेष रेल्वे गाड्या, उत्तर-दक्षिणेतील प्रवाशांची सोय

Special trains from Solapur division
Special trains from Solapur division

नगर ः रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यांचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे. 

यानुसार शुक्रवारपासून (ता. 9) पुणे- काझी पेठ- पुणे विशेष सुपरफास्ट एक्‍स्प्रेस (आठवड्यातून एकदा), मुंबई-चेन्नई विशेष सुपरफास्ट (रोज) धावणार आहेत.

या गाड्यांचे कोच आरक्षित असतील. पुणे- काझीपेठ एक्‍स्प्रेस पुणे स्थानकावरून प्रत्येक शुक्रवारी रात्री 10 वाजता सुटेल. दौंड, नगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, वरोरा, चंद्रपूर, बल्हारशाह, सिरपूर, रामगुंडम, पेद्दपल्लीमार्गे काझी पेठ स्थानकावर पोचेल. 

मुंबई-चेन्नई एक्‍स्प्रेस शनिवारपासून (ता. 10) रोज धावणार आहे. ती मुंबई स्थानकावरून सुटून दादर, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, खडकी, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी, यादगीर, रायचूर, अदोनी, गुंटकल, गुत्ती, ताडीपत्री, यरगुंटला, कडप्पा, राजमपेठ, कोडुरू, रेनिगुंठा, पुत्तूर, तिरुत्तनी, अरक्कोणम, टांग्रामार्गे चेन्नईस जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com