अकाेला : मानोरा तालुक्यात अवकाळीचा एक बळी

शेंदोना परिसरात अवकाळी पावसाचा फटका; झाडे पडली, इमारतीवरील टिनपत्रे उडाली
Akola manora one death heavy rain damage nature
Akola manora one death heavy rain damage naturesakal

मानोरा : तालुक्यातील शेंदोना येथे मान्सूनपूर्व पावसाने तांडव माजवून चक्रीवादळात सुसाट वाऱ्यामुळे झाड पडून २० मे सायंकाळी चार वर्षीय नयन धनाजी सातपुते या चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. शेंदोना गावातील काही नागरिक जखमी झाल्याची सुद्धा घटना घडली आहे.

सविस्तर असे की, मौजे शेंदोना येथे शुक्रवारी अवकाळी पाऊस, सुसाट्याच्या वादळी वाऱ्याने अचानक सायंकाळी धुमाकूळ घातला होता. या कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे अनेक घरांची टिनपत्रे हवेत उडाली. झाड उन्मळून पडत घरांची सुद्धा पडझड झालेली आहे. यात झाड उन्मळून अंगावर कोसळल्याने एका चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याचीही घटना घडली आहे. याबाबत महसूल विभागाने नुकसानीची पाहणी केली असून बाधित नागरिकांना शासनाने भरीव मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे. दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. विजेचा कडकडाट पावसाच्या सरीसह सुसाट वारा सुटल्याने शासकीय इमारतीसह अनेक नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडून अतोनात नुकसान झाले.

यासह पोहरादेवी, वसंतनगर, उमरी (खुर्द), उमरी (बु) भागातील उन्हाळी व फळांपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटात नुकसानीसह वृत्त लिहेपर्यंत या भागातील वीज पुरवठाही खंडित झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या वादळी पावसाने बहुतेक नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली आहे. त्यामुळे ती घरे देखील उघड्यावर आली आहे. उमरी (खुर्द ) येथे तिसऱ्यांदा चक्रीवादळ झाल्याने कांदा उत्पादक, फळबाग, टीनपत्रे आणि गोरगरीब मजूर वर्गांचे घरे पडल्यामुळे शासनाने प्रशासनाला पंचनामा करण्याचे आदेश देऊन पीडितांना नुकसान भरपाई द्यावी, असे मत सरपंच कपिल यांनी माहिती देताना व्यक्त केले.

निसर्गाची वीस दिवसात दुसऱ्यांदा अवकृपा

या गावातील धनजी नाईक वाचनालयाची सगळी टिनपत्रे उडाली असून वाचनालयामध्ये असलेली वृत्तपत्रे, ग्रंथसंपदा आणि फर्निचराचे मोठे नुकसान झालेले आहे. यापूर्वी याच महीन्यातील तीन मे रोजी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याचा फटका पशुहानी आणि आर्थिक हानीच्या रुपात शेंदोणा, वसंतनगर (पोहरादेवी) आणि उमरी खुर्द वासियांना सहन करावा लागला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com