पाच पटीनं वाढलंय रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीट

Akola News Railway platform ticket increased by five times
Akola News Railway platform ticket increased by five times

अकोला  : कोरोना विषाणू संसर्गाचा वेग वाढत असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्टेशनवरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आता प्लॅटफॉर्म तिकीट दरात पाच पट वाढ केली आहे. प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता १० रुपयांऐवजी थेट ५० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे ११ मार्च २०२१ नंतर १० जून २०२१ पर्यंत प्रवाशी व त्यांच्या नातेवाईकांना रेल्वे स्टेशनवर जावून प्लॅटफॉर्म तिकीट घेता येईल.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाने संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात रेल्वे गाड्या रद्द केल्या होत्या. परंतु त्यानंतर मिशन बिगिन अगेन अंतर्गत रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या. असे असले तरी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट देणे बंद केले होते. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी प्रवाशी व त्यांच्या नातेवाईकांची मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातील काही नामांकित स्थानकांवर प्लॅटफॉर्मची तिकीटे ११ मार्चनंतर देण्यात येतील, असे जाहीर केले आहे. परंतु त्याचे १० रुपयांवरुन ५० रुपये निश्चित करण्यात आले आहे. रेल्वेच्या या निर्णामुळे प्रवाशांना सोडण्यासाठी अथवा त्यांना घेण्यासाठी जाणाऱ्यांच्या खिशाला मात्र झळ बसेल.
-------------------
आधी घेण्यात येत होते पा रुपये
रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफाॅर्मवर जाण्यासाठी यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून पाच रुपये घेण्यात येत होते. त्यानंतर त्यात वाढ करून प्लॅटफाॅर्म तिकीट पाच रुपये करण्यात आले. त्यानंतर त्यात पुन्हा वाढ करण्यात आली होती. दरम्यान आता प्लॅटफाॅर्म तिकीट थेट ५० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना मिळेल.
------------
या स्टेशनवर लागू होणार निर्णय
प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये करण्याचा निर्णय भुसावळ मंडळातील नऊ रेल्वे स्थानकाला लागू होणार आहे. त्यामध्ये अकोला रेल्वे स्थानकासह नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, बडनेरा, अमरावती, खंडवा इत्यादी रेल्वे स्टेशनचा समावेश आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com