डीजे वाजविण्यास मज्जाव केल्याने पोलिसांवरच हल्ला; सात अटकेत

डीजे वाजविण्यास मज्जाव केल्याने पोलिसांना शिवीगाळ करून ठाणे अंमलदार कक्षाची तोडफोड
Attack on police
Attack on policeAttack on police

शेगाव (जि. बुलडाणा) : स्थानिक विश्वनाथनगरमध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना मध्यरात्रीपर्यंत डीजेच्या तालावर धिंगाणा सुरू होता. आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिस ठाण्यात याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करीत डीजे बंद केला. यामुळे चिडलेल्या नागरिकांनी पोलिसांना शिवीगाळ करून ठाणे अंमलदार कक्षाची तोडफोड (Attack on police) केली. ही घटना मध्यरात्री घडली. या प्रकरणात दोन महिलांसह सात जणांना (Seven arrested) अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगाव येथील विश्वनाथनगरमध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम (birthday party) सुरू होता. कार्यक्रमात डीजे लावण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत डीजेच्या तालावर (DJs are not allowed to play) नागरिकांचा धिंगाणा सुरू होता. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. यानुसार रात्री एक वाजता पोलिस विश्वनाथनगरमध्ये पोहोचले. पोलिसांनी डीजे वाजवणास मज्जाव करून डीजे बंद करायला लावला आणि दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

Attack on police
मलायका अरोरा हॉट फोटो शेअर केल्याने ट्रोल; यूजर्सनी वापरले अपशब्द

पोलिस दोघांना घेऊन ठाण्यात पोहोचले असता पाच ते सहा ६ जणांनी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना शिवीगाळ करीत ठाणे अंमलदार कक्षाची (Attack on police) तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांवर हल्ला करून चौकशीसाठी आणलेल्या दोघांना घेऊन पसार झाले. सहायक पोलिस निरीक्षक गौतम इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बळवंत चिंतामण बाभुळकर (वय ३१, रा. झाडेगाव), भारत अर्जुन बाभूळकर (रा. विश्वनाथनगर), नरेश अर्जुन बाभूळकर (वय ३०, रा. विश्वनाथनगर), सुनील बाबूराव खंडेराव (वय ३० रा. कारंजा) यांच्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी एका महिलेलाही ताब्यात घेतले होते. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू होता. सोमवारी सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांनी शेगाव पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यानंतर दुपारपर्यंत सातही आरोपींना पोलिसांनी अटक (Seven arrested) केली. आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com