अवैध नळ खंडीत करताना नागरिकांचा विरोध

अमृत योजनेतून दिलेल्या जोडण्यांची मनपाकडे नोंदच नाही
Citizens protest against illegal plumbing Amrut Yojana water scheme akola
Citizens protest against illegal plumbing Amrut Yojana water scheme akolasakal

अकोला : अमृत योजनेतून अकोला शहरात करण्यात आलेल्या जलवाहिनी टाकण्याच्या कामानंतर अनेक परिसरात नागरिकांनी नळ जोडण्या घेतल्या आहेत. या नळ जोडणी मनपाच्या अधिकृत प्लंबरकडून न झाल्याने त्याची नोंद मनपा प्रशासनाकडे नाही. अशा नळ जोडण्या खंडीत करण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकाला मलकापूर परिसरात नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे अतिक्रमण पथकाला बोलावून नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्यात. अकोला महानगरपालिका हद्दीत अमृत योजनेतून नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. काही ठिकाणी जुन्या जलवाहिनी काढून त्या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. त्यावरून नागरिकांनी नळ जोडण्याही घेतल्या आहेत.

मात्र, त्याची नोंद करताना संबंधितांनी दुर्लक्ष केले. ज्या कंत्राटदाराकडून या जोडण्या देण्यात आल्यात, त्यांनी परस्परच जोडणी दिल्याने प्रशासनाच्या नोंदी त्या अवैध ठरल्या आहेत. सध्या शहरात सुरू असलेल्या अवैध नळ जोडणी शोध मोहिमेत अशा जोडण्या आढळून आल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. जलप्रदाय विभागाचे पथक अवैध नळ जोडणीचा शोध घेत असताना आश जोडण्या आढळून आल्याने त्या खंडीत करण्यात येत असताना त्याला नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे अतिक्रमण निर्मुलन पथकाला प्राचारण करून या जोडण्या खंडीत करण्यात आल्यात.

गुलजारपुऱ्यात २० जोडण्या खंडीत

मनपा जलप्रदाय विभागाव्‍दारे नळ जोडणी खंडीत करण्‍याची मोहीम सुरू असून, शुक्रवार, ता. २० मे रोजी मनपा क्षेत्रातील पश्चिम झोन अंतर्गत गुलजारपुरा येथील मुख्य जलवाहिनीवरील २० अवैध नळ जोडण्या खंडीत करण्‍यात आल्यात. ही कारवाई जलप्रदाय विभागातील कनिष्ठ अभियंता शैलेश चोपडे, कनिष्ठ अभियंता तुषार टिकाईत, म.न.पा.झोन कंत्राटदार सुरेंद्र नारखेडे आदींच्या उपस्थिती करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com