Women's Day 2022 : महिला पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप!

महिला दिनी कौतुक सोहळ्यात उत्कृष्ट कार्याचा गौरव
Women's Day 2022
Women's Day 2022sakal

अकोला : पोलिस दलातील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला पोलिस अधिकारी व अंमलदारांचा महिला दिनाचे निमित्त साधून कौतुक सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी कायदेविषय मार्गदर्शनही करण्यात आले.

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राणी महल पोलिस लॉन येथे हा सोहळा पार पडला. अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या उपस्थित कायदेविषयक कार्यशाळेमध्ये सायबर क्राईम या विषयावर पोलिस निरीक्षक उज्ज्वला देवकर यांनी मार्गदर्शन केले.

सायबर गुन्हे कसे होतात व त्यापासून बचाव कासा करावा याबाबत माहिती दिली. पोलिस अंमलदार गोपाल मुकुंदे यांनी विनोदी शैलीतून बालकांची सुरक्षा संबंधाने ‘गुड टच, बॅड टच’ या विषयावर वेग वेगळे उदाहरण देऊन माहिती दिली. त्यानंतर पोलिस विभागातील अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल त्यांना उत्तेजनार्थ अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांचे हस्ते गौरविण्यात आले.

त्यामध्ये एपीआय विना भागत, प्रिती ताठे, पोलिस उपनिरीक्षक सुकेशीनी जमदाडे, विधी अधिकारी निलीमा मानोरकर, वंदना सावळे, महिला पोलिस हवालदार स्नेहल मानकर, पोलिस कर्मचारी प्रेमा इवनाते, उज्ज्वला मडावी, अनिता टेकाम, जोत्सना लाहोडे, वंदना संतोष गजभिये, प्रियंका मुलसिंग चव्हाण, अनिता रमेश खडसे, तुळसा दुबे, सोनू संजय आडे, अनुराधा सदानंन महल्ले, प्रिया गजानन शेगोकार, स्नेहा राजेंद्रसिंग चव्हाण, वंदना दहिभात, कावेरी ढाकणे, वंदना खाडे, आशा गायकवाड, सुनिता चव्हाण, अर्चना हरीदास घोडेस्वार, दिपाली विजयलाल अग्रवाल, हेमलता मरसकोल्हे, निता संके, दिपाली नाईक आदींचा समावेश आहे. प्रास्ताविक अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांनी केले. आभार प्रिती ताठे यांनी मानले. सूत्रसंचालन शुषमा नागरे यांनी केले. सदर कार्यक्रमामध्ये न्यू इंग्लिश स्कूल, डी.आर पाटील स्कूल, एनसीसी कॅडेड, तसेच महिला पोलिस अंमलदार, स्वास टीम सदस्य यांचा सहभाग होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com