संत्रा नगरी नागपूर ते संत नगरी शेगाव मेट्रो ट्रेन दुसऱ्या टप्प्यात

नितीन गडकरी यांनी दिले संकेत
संत्रा नगरी नागपूर ते संत नगरी शेगाव मेट्रो ट्रेन दुसऱ्या टप्प्यात

अकोला : संत्रा नगरी नागपूर ते संत नगरी शेगाव मेट्रो ट्रेन दुसऱ्या टप्प्यात सुरू करण्याचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. अकोल्यातील भाजपचे शिष्टमंडळाने नागपूर येथे त्यांची भेट घेवून मेट्रोचा विस्तार शेगावपर्यंत करण्याची विनंती करणारे निवेदन शनिवारी दिले.

विदर्भाची पंढरी म्हणून शेगाव नगरी ओळखली जाते. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचे वास्तव्य बरेच दिवस नागपूरला होते. त्यामुळे नागपूर सोबतच पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून शेगाव येथे येणारे गजानन महाराजांचे भक्तगण मोठ्या प्रमाणात असून, नागपूर येथे विमानतळ असल्यामुळे देश विदेशातील व विविध राज्यातून भक्तगण नागपूरला येऊन संत नगरी शेगाव येथे दर्शनासाठी जातात.

त्यांचे सुविधेसाठी तसेच अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा येथील नागरिक व व्यापाऱ्यांना नागपूर बाजारपेठ जवळ असल्यामुळे त्यांचा व्यापार विस्तारासाठी ‘संत्रा नगरी नागपूर ते विदर्भाची पंढरी संत नगरी शेगाव’ करिता मेट्रो ट्रेन सुरू करावी, अशी विनंती भाजप नेते डॉ. अशोक ओळंबे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

२४ ते २७ डिसेंबर रोजी होणाऱ्या ॲग्रोविजन कृषी प्रदर्शनासाठी आयोजित नियोजन बैठकीला उपस्थित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे या संदर्भातील निवेदन देण्यात आले. पहिल्या टप्प्यातील यवतमाळ, अंबा नगरी अमरावतीसह प्रस्तावित असलेल्या भागातील मेट्रोचे काम झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ‘संत्रा नगरी नागपूर ते संत नगरी शेगाव’ मेट्रोचे काम सुरू होईल, असे त्यांनी निवेदनकर्त्या शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी हरीश अलिमचंदानी, डॉ. संजय मांटे, श्याम अकोटकर, विष्णूपंत खाडे, राजेंद्र ठाकरे यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com