सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्ह्यातील पोलिसांचा सत्कार

उत्कृष्ट तपासासाठी पोलिस महासंचालकांकडून सन्मानित
Police in Akola district felicitated
Police in Akola district felicitatedSakal

अकोला - राज्याच्या पोलिस महासंचालकांनी अकोला जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व अमलदार यांना सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत व गुणात्मक अन्वेशनासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न केल्याबाबत पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.

अकोला जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व अमंलदार यांनी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट तपास करून गुणात्मक अन्वेशनासाठी सार्वोत्कृष्ट प्रयत्न व मालमत्ता हस्तगत केल्‍यात. त्यासाठी राज्याचे पोलिस महासंचालकांनी अकोला जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व अमंलदार यांना प्रशस्ती पत्र व बक्षीस देवून सन्मानित केले.

त्‍यात चान्नी पोलिस स्टेशनमध्ये नमुद गुन्ह्यांचा तपास करणारे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख व त्यांचे पथकातील अमंलदार प्रमोद डोईफोडे, अश्वीन शिरसाठ, संदीप ताले यांचा समावेश आहे. सन २०२१ मध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये एका अरोपीस अटक करून नमुद आरोपी कडून एकूण आठ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून त्यांचे कडून तीन लाख तीन हजार ६२ रुपयांची मालमत्ता हस्तगत केली होती. जानेवारी २०२१ करिता सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत केल्याबाबत रोख रक्कम १५ हजार व प्रशस्ती पत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.

एप्रिल २०२१ करिता रामदासपेठ पोलिस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या गुन्ह्यांचा तपास करणारे पोलिस नाईक प्रशांत इंगळे, शेख हसन, पोगजानन खेडकर, श्रीकांत पातोंड यांना पुरस्कार मिळाला. वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये तीन आरोपी निष्पन्न करून सात गुन्हे उघडकीस आणले होते व दोन लाख ३० हजार रुपयांची मालमत्ता हस्तगत केली होती. सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये औषधी व सोदर्य प्रशासन अधिनियम या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार व त्यांचे पथकातील अमलदार एएसआय. राजपालसिंग ठाकुर, गणेश पांडे, गोपाल पाटील यांना कोरोना काळातील रेमडीसीव्हर अफरातफर प्रकरणात एकूण २० आरोपी निष्पन्न करून अटक करून गुन्ह्यांचा तपास केल्याबद्दल जून २०२१ करिता सन्मानित करण्यात आले आहे.

रामदासपेठ पोलिस स्टेशनमध्ये दाखल चाईल्ड पोर्नग्राफी गुन्ह्यांत दोन आरोपी निष्पन्न करून अटक करून गुन्ह्याचा तपास मुदतीत कौशल्य पुर्वक पूर्ण केला. याकरिता जुलै २०२१ करिता त्यांना सन्मानित करण्यात आले. पोलिस महासंचालक, म. रा. मुंबई यांचे आदेशाने ता. १४ जून २०२२ रोजी विशेष उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मिणा (अमरावती परीक्षेत्र) यांनी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर व स्थानिक गुन्हे शाखा अकोल्याचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांचे उपस्थितीत प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com