Samantha Good News: दीपिका - कतरिना, आलियाला टाकलं मागे!

इ सकाळ ऑनलाइन

टॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री समंथा ही आता देशातील सर्वोत्तम अभिनेत्री ठरली आहे.

समंथानं आता दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ या आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. समंथानं सोशल मीडियावर पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी समंथाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आलेल्या वादळानं ती अस्वस्थ झाली होती. मात्र तिनं घेतलेली झेप चाहत्यांच्या कौतूकाचा चर्चेचा विषय आहे.

समंथानं आता दीपिका, आलिया आणि कतरिना यांना मागे टाकलं असून एक गुड न्युज दिली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

ऑरमॅक्स स्टार्स इंडिया लव्हच्या सर्वेक्षणातून एक माहिती समोर आली आहे त्यामध्ये समंथानं आपल्या नावाच दबदबा तयार केला आहे.

समंथानंतर आलियाचा क्रमांक असून पाचव्या स्थानावर दीपिका तर कतरिना ही सातव्या स्थानावर आहे.

नागा चैतन्यासोबत झालेल्या घटस्फोटानंतर समंथानं करिअरवर लक्ष केंद्रित केलं आहे. पुष्पामधील तिच्या डान्सनं प्रेक्षकांना घायाळ केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.