Janhvi Kapoor: 'तुझ्या लग्नाची आता वेळ आली!'

इ सकाळ ऑनलाइन

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर ही नेहमीच तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.

सध्या जान्हवी तिच्या एका फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे. त्यावरुन तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

यापूर्वी देखील जान्हवीच्या अनेक फोटोशुटला नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

सोशल मीडियावर अल्पावधीतच जान्हवीनं आपला मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. तिच्या फोटो आणि व्हिडिओला मिळणाऱ्या प्रतिसादावरुन ते दिसून आले आहे.

जान्हवीच्या आता नव्या फोटोशुटनं ती पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी चक्क लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.

जान्हवीचा तो बोल्डनेस पाहून तिचे चाहते चक्रावून गेले आहे. रेड कलरच्या बॅकलेस शिमरीमध्ये जान्हवीच्या त्या फोटोंनी लक्ष वेधून घेतले आहे.

गुंजन सक्सेना या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये इंट्री करणाऱ्या जान्हवीचा त्या फोटोशुटमधील अंदाज चाहत्यांना भावला आहे.

बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला ज्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत. त्यात जान्हवीचे नाव घेतले जाते. तिचे चाहते त्या फोटोंवर कौतूकाचा वर्षाव करत आहेत.

जान्हवीच्या त्या फोटोंना एका नेटकऱ्यानं रेड चेरी अशी उपमा दिली आहे. तर दुसऱ्यानं आता वेळ आली आहे तू लग्न करण्याची असं म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.