हॉटेलसारखे Crispy French Fries बनवा घरच्याघरी

सुस्मिता वडतिले

बटाट्याचा सर्वांत प्रसिद्ध आणि आवडता पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजे फ्रेंच फ्राइज.

तळलेल्या कुरकुरीत खमंग फ्राइजसोबत टोमॅटो सॉस किंवा आजकालच्या ट्रेंडप्रमाणे वरून चीज सॉस प्रत्येक पार्टीचा आकर्षण बिंदू असतो.

Crispy French Fries

कोणी कितीही म्हणो फ्राइज ‘अनहेल्दी’ असतात; पण समोर आलेल्या गरमागरम फ्राइजना कोणी नाकारत नाही.

Crispy French Fries

साहित्य - दोन मोठे बटाटे, दोन चमचे पेरीपेरी मसाला, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ.

Crispy French Fries

कृती - सर्वप्रथम बटाटे सोलून त्याचे काप करून घ्यावेत. नंतर पाण्याने धुवून घ्यावेत. कढईत पाणी गरम करून त्यात थोडे मीठ घालून त्यात बटाटे घालून ५ मिनिटे उकळून घ्यावेत.

Crispy French Fries

नंतर एका चाळणीत बटाटे उपसून त्यावर थंड पाणी घालून निथळून घ्यावे. एका स्वच्छ कपड्यावर बटाट्याचे काप १-२ तास पसरून ठेवावेत. नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात बटाट्याचे काप तळून घ्यावेत.

Crispy French Fries

आता या फ्रेंच फ्राईजवर पिरीपिरी मसाला भुरभुरून चांगले मिक्स करावे. सॉससोबत सर्व्ह करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crispy French Fries