'सरकार कुणाचे का येईना!' आमदार देवेंद्र भुयारांचा साखरपूडा थाटात

सकाळ डिजिटल टीम

अपक्ष आमदार देवेंद्र भुयार हे यांचा आज साखरपूडा पार पडला आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहे.

सध्या राजकीय वातावरण वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. अशा गदारोळात आमदार भुयार यांच्या साखरपुड्याला मात्र राजकीय नेत्यांची उपस्थिती नसल्याचे दिसून आले आहे.

काही दिवसांपूर्वी भुयार यांनी आपण महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचं अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी स्पष्ट केलं होतं.

सोशल मीडियावर मात्र आमदार भुयार यांच्या साखरपुडयाच्या फोटोंना नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर राज्यात मोठी उलथापालथ सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार भुयारही त्या बंडामध्ये सहभागी होण्याच्या मार्गावर होते अशी चर्चा होती.

गुवाहाटीला येण्यासाठी आपल्यालाही फोन आला होता असा खुलासा आमदार भुयार यांनी माध्यमांना सांगितले होते.

अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. ते आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

देवेंद्र भुयार हे शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते. राजू शेट्टी यांचे एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख होती. १० वर्ष त्यांनी राजू शेट्टी यांच्याशी काम केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.