नवज्योतसिंग सिद्धूला सश्रम कारावासाची शिक्षा; शिक्षा काय आहे ते जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

रोड रेज प्रकरणी माजी भारतीय क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

एखाद्या प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीला कारावासाच्या शिक्षेदरम्यान सक्तमजुरी दिली जाते.

सहसा कारागृहात राहणारे अंडरट्रायल कैदी स्वतःची किरकोळ कामे करतात.

मात्र, शिक्षा भोगत असताना न्यायालयाच्या सूचनेनुसार कारागृह व्यवस्थापनाकडून शिक्षा झालेल्या कैद्यांना वेगवेगळ्या प्रकारची कामे दिली जातात.

ज्यामध्ये साफसफाईचे काम, माळी, रंगकाम, सुतारकाम, दगड फोडण्याचे काम, स्वयंपाकघरातील काम, वेल्डिंग, रंगकाम आदी कामांचा समावेश आहे.

कारागृह व्यवस्थापन कठोर किंवा सश्रम कारावास भोगलेल्या लोकांकडून कठोर परिश्रम घेते.

कैद्यांना कठीण काम देण्यासह विहित वेळेत पूर्ण करायचे असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.