Urvashi Rautela चा ४० कोटींचा सोनेरी गाऊन पाहिलात का?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री आणि मिस युनिवर्स उवर्शी रौतेलाने नुकतीच अरब फॅशन वीकमध्ये हजेरी लावली होती.

या फॅशन वीकमध्ये उर्वशीने 40 कोटीचा गोल्डन गाऊन घातला होता. या गाऊनने साऱ्यांचे लक्ष वेधले.

दुबईस्थित लक्झरी फॅशन डिझायनर फर्ने वन अमांटोने डिझाइन केलेला गोल्डन हाय-थाई स्लिट गाऊन उर्वशीने यावेळी घातला होता. हा गाऊन बनवताना शुद्ध सोन्याचा वापर केला गेला होता.

डिझायनरने या ड्रेसमध्ये कोणत्याही प्रकारच्या कपड्याचा वापर न करता कागदावर सोन्याच्या तारांचा वापर केला.

तिने या गाऊनसोबत हेवी एम्बिलेटेड हेड अ‍ॅक्सेसरीज वापरली होती. त्यामुळे तिचा लूक आकर्षक दिसत होता.

उर्वशी अरब फॅशन वीकमध्ये दोनदा उपस्थित राहून रॅम्पवॉक करणारी पहिली भारतीय व्यक्ती ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.