परदेशी गुंतवणूक मर्यादावाढीमुळे अॅक्सिस बँकेचा शेअर उच्चांकी पातळीवर

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

मुंबई: अॅक्सिस बँकेचा शेअर आज(सोमवार) 2 टक्क्यांनी वाढून 11 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोचला आहे. रिझर्व्ह बँकेने परदेशी गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट स्कीमअंतर्गत(पीआयएस) अॅक्सिस बँकेत 74 टक्क्यांपर्यंत गुंतवणूकीस मंजुरी दिली आहे. परिणामी, आज बँकेच्या शेअरला मागणी वाढली आहे. मर्यादावाढीमुळे अॅक्सिस बँकेत 13,000 कोटी रुपये गुंतवणूकीचा ओघ दाखल होणे अपेक्षित आहे.

मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर 571.80 रुपयांवर सुरु झाला. त्यानंतर शेअरने 596 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 576.85 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(1 वाजून 15 मिनिटे) 574.85 रुपयांवर व्यवहार करत असून 1.79 टक्क्यांनी वधारला आहे.

टॅग्स