31 डिसेंबरपर्यंत ATM व्यवहार होणार निःशुल्क

Rupee_ATM_
Rupee_ATM_

मुंबई- बँकांनी कामाचे तास वाढविण्यासोबतच आपल्या ग्राहकांकडून 31 डिसेंबरपर्यंत पैशांचा भरणा आणि ATM मधून होणाऱ्या व्यवहारांवर शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 
500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्यामुळे सामान्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. 

आता मूल्यहीन ठरत असलेल्या 500 आणि 1000 च्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी व बदलून घेण्यासाठी लोकांची झुंबड पडत असल्याने ही गर्दी कमी व्हावी यासाठी बँकांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांनी SMS आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून ग्राहकांना या निर्णयाबाबत कळविले आहे.

देशातील सर्वात मोठी खासगी बॅक असणाऱ्या ICICI सह इतर बहुतांश बँकांनी ATM व्यवहारांवर शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

महिन्याला ATMमधून मोफत ट्रांझॅक्शन करण्यावर बंधन असल्यामुळे अनेकांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागले असते.
एका दिवसात ATM मधून जास्तीत जास्त 2000 रुपये काढता येणार आहेत. अधिक पैशांची गरज असणाऱ्या अनेक लोकांना वारंवार ATMच्या किंवा बँकेच्या फेऱ्या माराव्या लागण्याची शक्यता आहे.  

सध्या ATMमधून महिन्याभरात पाच व्यवहार मोफत केले जाऊ शकतात. यानंतरच्या व्यवहारासाठी बँकांकडून शुल्क आकारले जाते. मात्र अनेक बँकांकडून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत हे शुल्क आकारले जाणार नाही. लोकांना नोटा बदलून देण्यासाठी अनेक बँकांकडून अतिरिक्त काऊंटर सुरू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

आयसीआयसीआयने ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची मर्यादा 20 टक्क्यांनी वाढवली आहे. याशिवाय डेबिट कार्डच्या माध्यमातून केली जाणारी खरेदीची मर्यादा दुप्पट केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लोकांना जुन्या नोटा बदलण्यात अडचणी येत असल्याने सर्व बँका शनिवार आणि रविवारीही सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 
तर देशात सर्वाधिक शाखा असणाऱ्या बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा संध्याकाळी सहापर्यंत सुरू राहणार आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com