देशव्यापी बंदचा बँकिंग, वाहतुकीवर परिणाम शक्य

यूएनआय
शुक्रवार, 2 सप्टेंबर 2016

"महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी"

मुंबई/नवी दिल्ली- दहा प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी देशातील शुक्रवारी पुकारलेल्या बंदामध्ये सुमारे 18 कोटी कामगार सहभागी होतील असा अंदाज आहे. दरम्यान, देशव्यापी संपातून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने माघार घेतली आहे. त्यामुळे सरकारी कामकाजावर संपाचा परिणाम होणार नाही असे सांगण्यात आले. मात्र, बँकिंग आणि वाहतुकीवर परिणाम होऊन जनसामान्यांना त्याची झळ बसण्याची शक्यता आहे.

 

प्रमुख क्षेत्रांवर परिणाम झाल्याने आर्थिक व्यवहार ठप्प होण्याची चिन्हे आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानेही संपात सहभागी होणार नसल्याचे संघटनेनेम्हटले आहे. माघार घेतली तरी संपाला नैतिक पाठिंबा राहील, असेकर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कुलकर्णी यांनी सांगितले. 

 

देशव्यापी संपाला आयटकने पाठिंबा दिला आहे. कामगार कायद्यांत कामगारविरोधी बदल करणे बंद करा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी कामगार संघटनांनी हा बंद पुकारला आहे. यासोबत महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी आयटकने केली आहे.

Web Title: Strike paralyzes banking and transportation

टॅग्स
फोटो गॅलरी