बॅंकांची २५ टक्के एटीएम असुरक्षित

वृत्तसंस्था
रविवार, 22 जुलै 2018

नवी दिल्ली - सरकारी बॅंकांद्वारा संचलित सुमारे ७४ टक्के एटीएम ही कालबाह्य झालेल्या सॉफ्टवेअरवर सुरू आहेत. यापैकी २५ टक्के एटीएम फसवणुकीच्या दृष्टीने पूर्णपणे असुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सरकारी बॅंकांबाबत संसदेत उपस्थित एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान ही बाब समोर आली. बहुतांशी ‘एटीएम’मध्ये अद्याप कालबाह्य ठरलेल्या सॉफ्टवेअरचा वापर होत असून, सुरक्षेच्या ठोस उपायांअभावी या एटीएममध्ये गडबड होऊ शकते, अशी शक्‍यता सरकारने व्यक्त केली. जुलै २०१७ ते जून २०१८ या कालावधीत डेबिट, क्रेडिट कार्डसंदर्भात २५ हजार तक्रारी प्राप्त झाल्या असून, या कालावधीत झालेल्या एकूण ८६१ कोटी व्यवहारांच्या तुलनेत त्यांची संख्या खूपच कमी असल्याची माहितीही सरकारने संसदेत दिली. 

एटीएम फ्रॉडबाबत मध्यंतरी नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर रिझर्व बॅंकेने मार्गदर्शक सूचना जारी करीत संबंधित बॅंकांना सॉफ्टवेअर अपडेट करून घेण्यास सांगितले होते. मात्र, त्यासाठी निश्‍चित केलेल्या कालावधीत हे काम पूर्ण करणे अशक्‍य असल्याचे बॅंकांचे म्हणणे आहे.

‘एटीएम’ची सद्य:स्थिती 
२५ टक्के - पूर्णपणे असुरक्षित
८४ टक्के - कालबाह्य सॉफ्टवेअरचा वापर

Web Title: 25 percent ATM unsecure