अदानी समूह उभारणार ऑस्ट्रेलियात सौर प्रकल्प

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

मेलबर्न : भारतातील ऊर्जा क्षेत्रातील अदानी समूह ऑस्ट्रेलियात दोन मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी पुढील वर्षी सुरू करणार आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता पुढील पाच वर्षांत दीड हजार मेगावॉटवर जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.

या सौरऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीचा आराखडा आणि निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात अपारंपरिक ऊर्जानिर्मितीवर अदानी समूह भर देत आहे. हे सौर प्रकल्प दक्षिण ऑस्ट्रेलिया ाणि क्वीन्सलॅंड येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पांची एकूण क्षमता पुढील पाच वर्षांत दीड हजार मेगावॉटवर जाईल. अदानी समूहाने क्वीन्सलॅंड येथे कारमायकेल कोळसा खाण प्रकल्पात 16.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. मात्र, कायदेशीर अडचणीमुळे आणि पर्यावरणविषयक मंजुरीमुळे या प्रकल्पाला विलंब होत आहे.