उत्पन्नापेक्षा जमा अधिकची 18 लाख प्रकरणे : जेटली

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

नवी दिल्ली: नोटाबंदीनंतर उत्पन्नापेक्षा बॅंक खात्यावरील जमा जास्त असल्याची 18 लाख प्रकरणे समोर आली आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी दिली.

प्रश्‍नोत्तराच्या तासात बोलताना जेटली म्हणाले, ""उत्पन्नापेक्षा बॅंक खात्यावरील जमा अधिक असलेल्या प्रकरणांमध्ये संबंधित नागरिकांकडून माहिती मागविण्यात आली आहे. याला काही नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. माहिती न देणाऱ्या नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.''

""बॅंकिंग क्षेत्राच्या डिजिटायजेशनला विलंब लागत आहे. डिजिटायजेशनमुळे तंत्रज्ञानाशी छेडछाड होण्याचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बॅंका यासाठी तज्ज्ञांना नियुक्त करून यंत्रणेभोवतील "फायरवॉल' उभी करीत आहेत. यामुळे यंत्रणेची सुरक्षा सहजासहजी भेदणे शक्‍य नाही. तंत्रज्ञानाने गुन्हे करण्याच्या पद्धतीप्रमाणे बदलायला हवे. बॅंकांना यातील धोक्‍याची जाणीव असून, त्या सातत्याने सुरक्षेचा आढावा घेत आहेत,'' असे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका आणि प्रादेशिक ग्रामीण बॅंकांमध्ये 31 मार्च 2016 रोजी 29 टक्के बचत खाती निष्क्रिय होती. याला अनेक कारणे कारणीभूत आहेत. यात निवासाचे ठिकाण बदलल्याने दुसरीकडे नवे खाते उघडणे, खातेधारकाचा मृत्यू, सोईच्या बॅंकेमध्ये नवे खाते उघडणे आदी कारणांचा समावेश आहे. 
- अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री