एअरटेलकडून रोमिंग शुल्क रद्द

Airtel Removes Roaming Charges On Calls, Data
Airtel Removes Roaming Charges On Calls, Data

एक एप्रिलपासून होणार अंमलबजावणी

नवी दिल्ली: रिलायन्स जियान्सोबतच्या वाढत्या स्पर्धेमुळे देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आता रोमिंग शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एअरटेल व्हॉइस कॉल व डेटा सेवांवरील रोमिंग शुल्क बंद करणार आहे. एक एप्रिलपासून या घोषणेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रिलायन्स जियोच्या धमाकेदार प्रवेशानंतर भारतातील दूरसंचार क्षेत्रातील सेवांसाठी "मूल्ययुद्ध' (प्राइस वॉर) सुरू झाले आहे.

याबाबत एअरटेलने जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, की ""एअरटेल रोमिंगविरोधात युद्ध घोषित करत आहे. 1 एप्रिलपासून राष्ट्रीय रोमिंग संपुष्टात येणार आहे. एअरटेलचे इनकमिंग कॉल्स, मेसेजेसवरील रोमिंग शुल्क रद्द करण्यात येणार आहेत. याचसोबत आउटगोइंग कॉल्सवरील प्रीमियम शुल्क बंद करण्यात येणार आहे. याचसोबत राष्ट्रीय रोमिंगवर अतिरिक्त डेटा शुल्क लागू करण्यात येणार नाही. मागील वर्षी ऑक्‍टोबरमध्ये व्होडाफोनने इनकमिंग कॉल्स रोमिंग फ्री केले होते. एअरटेलने रोमिंग शुल्क बंद केल्याने त्यांच्या महसुलात तीन ते साडेचार टक्के घट होण्याची शक्‍यता आहे.

एअरटेलने आंतरराष्ट्रीय कॉल दरातही नव्वद टक्‍क्‍यांपर्यंत कपात केलेली आहे. सध्या एअरटेलकडून आंतरराष्ट्रीय कॉलसाठी प्रतिमिनीट 3 रुपये शुल्क आकारले जाते, तर डेटा सुविधांवरील शुल्कात तब्बल 99 टक्‍क्‍यांपर्यंत कपात करत तीन रुपये प्रतिएमबी इतके रोमिंगविरहीत शुल्क आकारले जात आहे.
देशात एअरटेलचे 26 कोटी 80 लाख वापरकर्ते आहेत. एयरटेलने रोमिंग वॉर सुरू केल्यानंतर व्होडाफोन आणि आयडिया या दूरसंचार क्षेत्रातील कंपन्याही त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करण्याची शक्‍यता आहे. रिलायन्स जियोच्या मोफत रोमिंग, मोफत वॉइस कॉल आणि डेटा ऑफर्सला आव्हान देण्यासाठी आयडिया सेल्यूलर व व्होडाफोनचे भारतीय विभाग विलीनीकरण करून नवीन कंपनी बनविण्याच्या तयारीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com