भारती एअरटेल विकली ‘इन्फ्राटेल’मधील 11 टक्के हिस्सेदारी

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

मुंबई: 'नेटल इन्फ्रास्ट्रक्चर इनवेस्टमेंट'ने भारती इन्फ्राटेलमधील 11.32 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. भारती इन्फ्राटेलचे पालक कंपनी असलेल्या भारती एअरटेलसोबत खरेदीचा करार करण्यात आला आहे.

नेटल इन्फ्रास्ट्रक्चरने भारती इन्फ्राटेलच्या 2,09,416,643 कोटी शेअर्सची खरेदी केली आहे. सुमारे रु.6,806 कोटींना हा व्यवहार पार पडला आहे. नेटल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी भारती इन्फ्राटेलच्या शेअरच्या बाजारभावाप्रमाणे शेअर्स खरेदी केले आहेत. नेटल इन्फ्रास्ट्रक्चरसोबत करार पूर्ण झाल्यानंतर पालक कंपनी असलेल्या भारती एअरटेलची हिस्सेदारी 71.96 टक्क्यांवरून कमी होऊन 60.33 टक्क्यांवर येणार आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात भारती इन्फ्राटेलचा शेअर 330.35 रुपयांवर व्यवहार करत असून तो 11.60 रुपयांनी म्हणजेच 3.64 टक्क्यांनी वधारला आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.61,074.06 कोटींचे बाजारभांडवल आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 283.10 रुपयांची नीचांकी तर 412.55 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे.