दोनशेची नोट आजपासून चलनात

पीटीआय
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

रिझर्व्ह बॅंकेची घोषणा; पन्नासची नोटही लवकरच व्यवहारात येणार

मुंबई - देशात पहिल्यांदाच २०० रुपयांची नोट उद्यापासून (शुक्रवार) चलनात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे. दोनशे रुपयांच्या नोटेमुळे चलनातील कमी मूल्यांच्या नोटांची उपलब्धता अधिक होणार आहे. 

देशात पहिल्यांदाच दोनशे रुपयांची नोट चलनात येत असून २५ ऑगस्ट २०१७ पासून दोनशे रुपयांची महात्मा गांधींची सिरीज (नवी) असणारी नवी नोट चलनात आणत आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात दिली. याचसोबत पन्नास रुपयांची नवी नोट लवकरच व्यवहारात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दोनशेच्या नोटेची वैशिष्ट्ये 
१) दोनशेच्या नोटेचा आकार ६६ मिमी रुंद आणि १४६ मिमी लांब असणार आहे.
२) नोटेचा रंग पिवळसर असेल. 
३) नोटेवर इंग्रजी व देवनागरी अशा दोन्ही अंकांमध्ये दोनशे रुपयांचा उल्लेख असेल. 
४) नोटेच्या मध्यभागी असणाऱ्या सुरक्षा पट्टीत भारत आणि भारतीय रिझर्व्ह बॅंक असे लिहिलेले असेल. 
५) महात्मा गांधींच्या छायाचित्राच्या उजव्या बाजूस प्रतिज्ञा व वचन तसेच गव्हर्नरची स्वाक्षरी आणि रिझर्व्ह बॅंकेचे प्रतीक असेल. 
६) नोटेच्या उजव्या बाजूस अशोक स्तंभाचे चिन्ह असेल. दुसऱ्या बाजूवर नोटेच्या डाव्या बाजूस छपाईचे वर्ष दिसेल.
७) नोटेवर स्वच्छ भारत अभियानाचे चिन्ह हे अभियानाच्या घोषवाक्‍यासह असणार आहे. 
८) सांची स्तूपाचे नक्षीकामही नोटेवर छापले जाणार आहे.
९) तसेच विविध भाषांचे पॅनेलही असणार आहे.