टेक महिंद्रा अमेरिकेत 2,200 नव्या लोकांना नेमणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

न्युयॉर्क: माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख भारतीय कंपनी टेक महिंद्राने आपल्या अमेरिकेतील व्यवसायासाठी यावर्षी 2,200 नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेत टेक महिंद्रामध्ये 6,000 कर्मचारी कार्यरत असून 400 ग्राहक आहेत.

"गेल्यावर्षी आम्ही 2,2000 लोकांची नियुक्ती केली होती आणि यावर्षीदेखील तसेच करण्याची आमची योजना आहे", असे टेक महिंद्राच्या स्ट्रॅटेजिक व्हर्टिकल्स विभागाचे अध्यक्ष लक्ष्मणन चिदंबरम यांनी सांगितले.

अमेरिकन सरकारची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे चिदंबरम यांनी स्पष्ट केले. तसेच, काही विशिष्ट तंत्रज्ञान स्थानिकांच्या मदतीने अधिक यशस्वी होऊ शकते, असेही ते यावेळी म्हणाले.