बॅंक संघटनांचा आज संसदेवर मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - बॅंकांचे खासगीकरण, एकत्रीकरण, यासह विविध मागण्यांसाठी बॅंक संघटनांच्या संयुक्त संघटनांतर्फे शुक्रवारी (ता. १५) संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. बॅंक कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही भेटणार आहेत. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन अर्थमंत्र्यांना देण्यात येणार आहे. पंतप्रधानांनी या कर्मचाऱ्यांना अद्याप भेटीची वेळ दिलेली नाही.

‘युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्स’ या व्यासपीठावर एकत्र आलेल्या विविध बॅंक कर्मचारी संघटनां शुक्रवार संसदेवर  मोर्चा काढणार आहेत आणि नोव्हेंबरमध्येही पुन्हा एकदा आंदोलन करण्याची तयारी करण्यात येत असल्याचे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.