‘बिझनेस ॲनालिस्ट’चे कंपन्यांमध्ये वाढते महत्त्व

‘बिझनेस ॲनालिस्ट’चे कंपन्यांमध्ये वाढते महत्त्व

पुणे - व्यवसायामध्ये कार्यक्षम व स्पर्धात्मक राहण्यासाठी निरंतर सुधारणांची गरज असते. या निरंतर सुधारणांच्या प्रकियेमध्ये ‘बिझनेस ॲनालिस्ट’चा महत्त्वाचा वाटा असतो. यामुळेच कंपन्यांमध्ये ‘बिझनेस ॲनालिस्ट’चे महत्त्व वाढत चालले आहे, असे मत व्यवसायतज्ज्ञ व हाँगकाँगस्थित लेखिका संध्या जेन यांनी व्यक्त केले.

संध्या जेन यांनी लिहिलेल्या ‘बिझनेस ॲनालिसीस- द क्वेश्‍चन अँड आन्सर बुक’ या पुस्तकाचे प्रकाशन औंध येथील ‘क्रॉसवर्ड’ येथे करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या.

हे पुस्तक केवळ व्यावसायिकांसाठीच उपयोगी नसून, विविध आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत घेतल्या जाणाऱ्या व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना या परीक्षांच्या सर्वंकष तयारीसाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रश्नोत्तराच्या रूपात लिहिलेल्या या पुस्तकाचा उपयोग गुंतागुंतीच्या व्यवसायाच्या तक्रारी दूर करण्यासाठी तर होणार आहेच; परंतु ज्यांना व्यवसाय जगताचे थोडेफार ज्ञान आहे अथवा ज्यांना काहीच ज्ञान नाही; परंतु व्यवसाय करायचा आहे, अशा सर्वांना हे पुस्तक उपयुक्त ठरणार असल्याचे जेन यांनी सांगितले.

एखाद्या व्यवसायाचे विश्‍लेषण करताना व्यवस्थापन प्रक्रिया आणि व्यवसायातील बदलांची अंमलबजावणी या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. व्यवसायातील बदल म्हणजे सरकारकडून केले गेलेले नवीन नियम, ग्राहक 
आधार अद्ययावत करणे किंवा 

नवीन तंत्रज्ञान अशा 
स्वरूपाचे असतात. बदल ही कायम सुरू राहणारी प्रक्रिया आहे. आज कोणताही व्यवसाय तंत्रज्ञानाशिवाय यशस्वीपणे चालू शकत नाही. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायातील हे बदल कसे हाताळायचे यासाठी हे पुस्तक मदत करते, असे त्यांनी नमूद केले.

संध्या यांनी अनेक महत्त्वाकांक्षी आणि अनुभवी बिझनेस ॲनालिसिस व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो बिझनेस ॲनालिस्टनी यशस्वीरीत्या त्यांचे करिअर सुरू केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com