व्यवसायांची 30 जुलैपर्यंत जीएसटीअंतर्गत नोंदणी करा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

केंद्र सरकारचे आवाहन 

नवी दिल्ली - देशातील व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायांचे वस्तू व सेवा करांतर्गत (जीएसटी) 30 जुलैपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले. याचसोबत 20 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना नोंदणी करण्याची आवश्‍यकता नसल्याचेही केंद्रीय अर्थमंत्रालयाने आपल्या परिपत्रकामध्ये म्हटले आहे.

'जीएसटी'अंतर्गत मिळणाऱ्या फायद्यांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्‍यक आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता व्यावसायिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वीस लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असणाऱ्या (विशेष संवर्ग राज्यांमध्ये 10 लाख रुपये) व्यापाऱ्यांना नोंदणीतून सवलत देण्यात आली आहे. तसेच जे करदाते "जीएसटी'अंतर्गत नोंदणी करण्याची आवश्‍यकता नाही, अशा करदात्यांनी 22 जुलैपर्यंत त्यांची नोंदणी रद्द करावी. तसेच जे व्यापारी स्थलांतरीत झाले नाही पण जे "जीएसटी'अंतर्गत नोंदणीस पात्र आहेत, त्यांनी नोंदणी करावी, असेही या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

ऑनलाईन नोंदणी शक्‍य 

व्यावसायिकांकडे वैध पॅन कार्ड, ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर आदी असल्यास ऑनलाईन नोंदणी करणे शक्‍य आहे. यासाठी https://www.gst.gov.in/ या वेबपोर्टलवर जाऊन नोंदणी करावी.