बनावट कर्जप्रकरणी सीबीआयचे १६ ठिकाणी छापे

पीटीआय
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेच्या साठ कोटी रुपयांच्या बनावट कर्जप्रकरणी केंद्रीय अन्वेषणने (सीबीआय) आठ गुन्हे दाखल केले आहेत. तसेच याप्रकरणी दिल्ली आणि अंबाला येथील १६ ठिकाणी छापे टाकून तपास केला आहे.

सीबीआयने व्यावसयिक दीपक गुप्ता, त्यांची पत्नी पल्लावी, विनीत गुप्ता, आदिता मीडिया नेटवर्क प्रा.लि., डीजी फूटवेअर प्रा.लि., सॉफ्टमॅक्‍स प्रा. लि., श्रीहरी ओव्हरसीज आणि मेरोज ट्रेडिंग प्रा. लि. यांच्यासह इतर तिघांवर गुन्हे नोंदवले आहेत. गुन्हा नोंदविण्यात आलेल्या व्यक्ती व कंपन्या दीपक गुप्ता यांच्याशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.