रोजगारनिर्मितीचे आव्हान - अरविंद पनागरिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

यंदा विकासदर ७.५ टक्क्यांवर जाणार
न्यूयॉर्क - आर्थिक सुधारणांमुळे चालू वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.५ टक्‍क्‍यांनी वाढेल, असा विश्‍वास निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनागरिया यांनी व्यक्त केला आहे. चालू वर्षअखेर विकासदर आठ टक्‍क्‍यांच्या आसपास राहील. त्याच वेळी रोजगारनिर्मितीचेही सरकारसमोर आव्हान असेल, असे त्यांनी सांगितले. 

अर्थव्यवस्थेची वाढ झपाट्याने होत आहे. वाहन उद्योग, वाहनांचे सुटे भाग, अभियांत्रिकी उत्पादने, पेट्रोलियम रिफायनरी, फार्मा आणि आयटी सेवा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांची चांगली प्रगती झाली आहे; पण रोजगारनिर्मिती समाधानकारक झालेली नाही, असे पनागरिया यांनी सांगितले. कनिष्ठ आणि मध्यम पातळीवरील रोजगार निर्माण करणे आवश्‍यक आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले. आठ टक्के विकासापेक्षाही रोजगारनिर्मिती हे सरकारसमोर सर्वांत मोठे आव्हान आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात पनागरिया यांनी संयुक्‍त राष्ट्रांच्या उच्च पदस्थ राजकीय समितीसमोर ‘भारताच्या शाश्‍वत विकासाची उद्दिष्ट्ये’ या विषयावरील अहवाल सादर केला. माध्यमांनी विकासाबाबत केलेल्या विधानांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. काही माध्यमांनी ‘रोजगारशून्य विकास’ असे चित्र रंगवले आहे. हे चूक आहे. रोजगार निर्माण होत नसल्याचा दावा केला जातो. गुंतवणुकीत समाधानकारक वाढ नाही, अशी आवई उठवली जाते, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

चांगला विकासदर हा केवळ उत्पादकतेनुसार ठरवला जात नाही. अर्थव्यवस्थेची वाढ समाधानकारक होत आहे. वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत विकासदर आठ टक्‍क्‍यांसमीप राहील.
-  अरविंद पनागरिया, अध्यक्ष, निती आयोग